Navneet Rana : आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाला शिवसैनिकांचं गिफ्ट, बॅनर लावून नवनीत राणांना डिवचलं

Shiv Sainiks criticized Navneet Rana : अमरावती लोकसभेचा विजय हा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीकरांकडून अर्पण केल्याचा बॅनर शिवसैनिकांनी लावला.
Navneet Rana
Navneet Rana sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News: लोकसभा निवडणुकीत अमरावती मतदारसंघातील नवनीत राणा यांचा पराभव चर्चेचा विषय ठरला. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी हनुमान चालीसा म्हणत त्यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला होता. राणांच्या पराजयानंतर आदित्य ठाकरेंच्या वाढदिवसाचे निमित्त साधत शिवसैनिकांनी बॅनर लावत नवनीत राणांना डिवचले आहे.

अमरावती येथे आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसैनिकांनी लावलेल्या बॅनरवरराजकीय स्वार्थासाठी रस्त्यावर होणारी हनुमान चालीसा बंद झाली. मातोश्रीवर चाल करू पाहणारी स्वयंघोषित हिंदू शेरनी घायाळ झाली, असा मजकूर लिहला आहे. या बॅनरद्वारे शिवसैनिकांनी नवनीत राणांची खिल्ली उडवली आहे.

विजय आदित्य ठाकरेंना अपर्ण

अमरावती लोकसभेचा विजय हा शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे Aaditya Thackeray यांच्या वाढदिवसानिमित्त अमरावतीकरांकडून आम्ही त्यांना अर्पण करतो, असा देखील बॅनवर लिहले आहे. हे बॅनर शिवसेना महानगरप्रमुख पराग गुडधे यांनी यांनी लावले आहे.

Navneet Rana
Anil Deshmukh : कोणी लहान-मोठा भाऊ नाही; लोकसभेनंतर अनिल देशमुखांचा कॉन्फिडन्स वाढला

काँग्रेसकडून पराभव

नवनीत राणा Navneet Rana महायुतीकडून भाजपच्या उमेदवार होत्या. तर महाविकास आघाडीकडून बळवंत वानखेडे हे उमेदवार होते. तर, बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून देखील उमेदवार रिंगणात होता. बळवंत वानखेडे यांनी नवनीत राणा यांचा पराभव करत या निवडणुकीत विजय मिळवला.

Navneet Rana
Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार राज्यसभेच्या उमेदवार, मंत्रिपदही मिळणार?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com