Sunetra Pawar : मोठी बातमी! सुनेत्रा पवार राज्यसभेच्या उमेदवार, मंत्रिपदही मिळणार?

Sunetra Pawar Rajya Sabha candidate Ajit Pawar : काटेवाडीतून देखील राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार वहिनींना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली होती.
Sunetra Pawar Rajya Sabha candidate
Sunetra Pawar Rajya Sabha candidatesarkarnama
Published on
Updated on

Sunetra Pawar News : राज्यसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) सुनेत्रा पवार यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे. त्यांनी आज (गुरुवारी) आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सुनेत्रा पवार यांना केंद्रात मंत्रिपद देखील मिळणार असल्याचे वृत्त साम टिव्हीने दिले आहे.

राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी मधून विविध नावे चर्चेत होती. त्यामध्ये प्रामुख्याने सुनेत्रा पवार बाबा सिद्दीकी, समीर भुजबळ, छगन भुजबळ आणि नितीन पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.

बारामती मधील काटेवाडीतून देखील राष्ट्रवादीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुनेत्रा पवार Sunetra Pawar वहिनींना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे केली होती. तर, पुणे शहरध्यक्ष दीपक मानकर यांनी देखील सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यासाठी ठराव केला होता. तसे पत्र देखील त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले होते.

दरम्यान, विधानसवनामध्ये सुनेत्रा पवार यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, मंत्री छगन भुजबळ, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आदी उपस्थित होते.

मी नाराज नाही

राज्यसभेची उमेदवारी मिळाली नसल्याने छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, छगन भुजबळ Chhagan Bhujbal यांनीच आपण नाराज नसल्याचे स्पष्टीकरण दिले. राज्यसभेसाठी तब्बल 13 जण इच्छुक होते. सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीचा निर्णय पक्षाने सर्वानुमते घेतल्याचे देखील भुजबळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com