Uddhav Thackeray Vidarbha Daura: उद्धव ठाकरेंना पोहरादेवीच्या महंतांचा आशीर्वाद; मानले दत्तकपुत्र

Uddhav Thackeray Vidarbha Tour: उद्धव ठाकरे हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama
Published on
Updated on

Poharadevi: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. आज (ता. ९जुलै) पोहरादेवीचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरेंनी दौऱ्याला सुरुवात केली.

पोहरादेवीच्या दर्शनानंतर उद्धव ठाकरेंनी संजय राठोड यांचा मतदारसंघ असलेल्या दिग्रस येथे सभा घेतली. यावेळी त्यांनी भाजपावर जोरदार हल्लाबोल केला. आपल्या भाषणात ठाकरे यांनी पोहरादेवी संस्थानने दिलेल्या आशीर्वादाचाही उल्लेख केला.

Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News : विधानसभा अध्यक्षांनी चौकटीच्या बाहेर जर निर्णय दिला, तर... ठाकरेंचा इशारा

उद्धव ठाकरे म्हणाले ''आमदार खासदार गेले मात्र, दमदार शिवसैनिक माझ्यासोबत आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना मी पोहरादेवीला आलो होतो. मी विकासाचा आराखडा मंजूर केली. त्यासाठी निधी दिला. मात्र, अद्याप इथे काहीही काम झालेले नाही, तसेत रस्ता सुद्धा निट नाही. निधी कुठे गेला याबद्दल सरकारने उत्तर द्यावे.

ठाकरे पुढे म्हणाले, पोहरादेवीच्या दर्शनाला गेलो. सुनिल महाराज आणि साधू-संतांनी मला अनेक आशीर्वाद दिले. मला एक पट्टा दिला आणि कडे दिले. या कड्याचे महत्व असे की, आम्ही तुम्हांला दत्तकपुत्र मानतो, असे महंतांनी मला सांगितले असे ठाकरे म्हणाले. त्यामुळे पोहरादेवीचा विकास करुन अभिमान वाटेल, असे चित्र निर्माण करु. सरकारच्या नाकात दम आणून तीर्थक्षेत्राचा कायापालट करुन दाखवायचा असल्याचे ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray News
Kishor Aware Murder Case : आवारे खूनाचा मुख्य सूत्रधार पकडला गेल्याने शेळके बंधूंच्या 'क्लीन चिट'ची शक्यता बळावली

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांना नोटीस बजावली. याकडे कसे पाहता? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने अर्थ काढून दिला. त्यापलीकडे कोणालाही पाहता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्पष्ट निकाल दिला. त्या निकालाच्या चौकटीत अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. चौकटीच्या बाहेर जर निर्णय दिला, तर न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com