Uddhav Thackeray News : विधानसभा अध्यक्षांनी चौकटीच्या बाहेर जर निर्णय दिला, तर... ठाकरेंचा इशारा

Uddhav Thackeray vidarbha tour : पक्ष पळवल्यानंतर सुद्धा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News Sarkarnama
Published on
Updated on

Shivsena News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे दोन दिवसीय विदर्भ दौऱ्यावर आहेत. यवतमाळमधील पोहरादेवीच्या दर्शनाने ठाकरे यांनी महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात केली. या वेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) फुटीवर प्रतिक्रिया व्यक्त केली.

या पूर्वी राजकारणात पक्ष फोडला जायचा. आता पक्ष पळवले जात आहेत. पक्ष पळवल्यानंतर सुद्धा आम्हाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ही परंपरा देशासाठी वाईट आहे. तुम्ही काळजी करू नका, आम्ही बरोबर आहे, असे आम्हाला लोकांकडून सांगितले जात आहे, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Uddhav Thackeray News
MLA Disqualification News : 'दहा ऑगस्टच्या आधी विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय द्यावा लागणार'

विधानसभा अध्यक्षांनी १६ आमदारांना नोटीस बजावली. याकडे कसे पाहता? या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने अर्थ काढून दिला. त्यापलीकडे कोणालाही पाहता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) स्पष्ट निकाल दिला. त्या निकालाच्या चौकटीत अध्यक्षांना निर्णय घ्यावा लागेल. चौकटीच्या बाहेर जर निर्णय दिला, तर न्यायालयाचे दरवाजे उघडे आहेत, असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News : विदर्भ दौऱ्यात ठाकरेंची पक्षबांधणीला सुरुवात; पहिला उमेदवारही ठरला

विदर्भ दौऱ्यावर भाजपाने टीका केली, याबद्दल विचारल्यावर ठाकरे म्हणाले, भाजपा काहीही बोलण्याच्या लायकीचा राहिलेला नाही. दुसऱ्यांवर दोषारोप करण्याचे सोडून द्यावे. पहिले आपल्या घरात बाजरबुणगे घुसले आहेत, त्यांचा संभाळ करावा, असा टोला लगावला.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com