Uddhav Thackeray News : विदर्भ दौऱ्यात ठाकरेंची पक्षबांधणीला सुरुवात; पहिला उमेदवारही ठरला

Uddhav Thackeray Vidarbha tour : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत.
Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray NewsSarkarnama

Shivsena News : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या दोन दिवसांच्या विदर्भ दौऱ्यावर आहेत. ठाकरे यांचा हा विदर्भ दौरा पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्वाचा मानला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या सभेमध्ये शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी पहिला उमेदवारही जाहीर केला आहे.

यावेळी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मंत्री संजय राठोड यांच्या मतदारसंघात दिग्रसमध्ये सभा झाली. या सभेमध्ये बोलताना खासदार अरविंद सावंत (Arvind Sawant) म्हणाले, खासदार, आमदार गेले तरी चालतील पण, आमदार, खासदार करणारे शिवसैनिक आमच्या सोबत आहेत. आम्ही कोण होतो, सामान्य होतो. मात्र, सामान्यांना असामान्य करणारी शिवसेना (Shivsena) आहे.

Uddhav Thackeray News
MLA Disqualification News : 'दहा ऑगस्टच्या आधी विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निर्णय द्यावा लागणार'

यवतमाळमध्ये आज आपल्याकडे एकही खासदार नाही आमदारही नाही. मात्र, हे येथे बसलेले संजय देशमुख असेच आलेले नाहीत. त्यांना पुढील निवडणुकीत आमदार करणार आहे. त्यामुळे आता संजय राठोड यांच्या विरोधात संजय देशमुख यांची उमेदवारीच अरविंद सावंत यांनी जाहीर करुन टाकली, असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांची यवतमाळमध्ये पत्रकार परिषद घेत भाजपावर (BJP) जोरदार हल्लाबोल केला होता. तसेच पक्ष फुटीबाबत देखील त्यांनी भाष्य केले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी पोहरादेवीचे दर्शन घेतले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी जनतेला आवाहन करत मी तुमच्यासाठी लढत असून अशीच नेहमी साथ द्या, असे भावनिक अवाहन केले.

Uddhav Thackeray News
Uddhav Thackeray News: आज माझ्याकडे पक्ष नाही, पण...; उद्धव ठाकरेंचं पोहरादेवी गडावरून भावनिक आवाहन

ठाकरे म्हणाले, "आज माझ्याकडे पक्ष नाही. पण तुमचे प्रेम आहे आणि हे तुमचे प्रेम कायम असेच राहू द्या. मी तुमच्यासाठी लढत आहे. तुम्ही या लढाईमध्ये माझ्या खांद्याला खांदा लावून माझ्याबरोबर राहा"

Edited by : Amol Jaybhaye

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com