Shiv Sena Sagar Bharuka : हॉटेलमध्ये गोंधळ, 15 लाखांच्या खंडणीची मागणी? शिंदेच्या शिवसेनेचा सागर भारुका अटकेत

Shiv Sena corporator Sagar Bharuka arrested in Akola over alleged Rs 15 lakh extortion demand at a hotel : अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांची कारवाई; हॉटेलमध्ये गोंधळ घातल्याचा आणि 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप, भारुका यांनी राजकीय दबावाचा दावा केला
shiv sena
shiv senasarkarnama
Published on: 
Updated on: 

Akola Crime News : अकोला महापालिकेतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे गटनेते आणि नगरसेवक सागर भारुका यांच्यावर खंडणीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलिसांनी ही कारवाई केली असून, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी भारुका यांना रात्री उशिरा अटक केली. त्यांना आज न्यायालयात हजर केले जाणार आहे.

पोलिसांत (Police) दाखल तक्रारीनुसार, 3 ऑक्टोबरच्या रात्री बसस्थानक परिसरातील हॉटेल कृष्णा इम्पेरियलमध्ये जाऊन गोंधळ घातल्याचा आणि हॉटेल मालकाकडे 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप सागर भारुका यांच्यावर करण्यात आला आहे.

हॉटेल कर्मचारी शोएब अख्तर जमील अख्तर यांनी याप्रकरणी सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी सागर भारुका यांच्याविरोधात खंडणीसह इतर कलमांखाली गुन्हा (Crime) नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना अटक केली.

shiv sena
Manoj Jarange Patil : 'मला प्रचंड त्रास देणे सुरू आहे'; जरांगे पाटलांची खदखद दसऱ्या मेळाव्यातून बाहेर पडणार

दरम्यान, सागर भारुका यांनी या आरोपांना राजकीय पार्श्वभूमी असल्याचा दावा केला आहे. महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या दबावामुळे आपल्याला या प्रकरणात जाणीवपूर्वक गोवण्यात आले, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कारवाईसोबतच भारुका यांनी केलेल्या आरोपांमुळे या प्रकरणाला राजकीय वळण मिळाले आहे.

shiv sena
Gyanesh Kumar removal : ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा नको, थेट बडतर्फ करा; पृथ्वीराज चव्हाणांची ठेवलं कायद्यावर बोट

मात्र, भारुका यांच्या आरोपांबाबत पोलिसांकडून किंवा सत्ताधारी भाजपकडून अधिकृत भूमिका समोर येणे बाकी आहे. त्यामुळे खंडणीच्या आरोपांची सत्यता तपास आणि न्यायालयीन प्रक्रियेत स्पष्ट होणार आहे.

विजय अग्रवाल यांच्यासोबतचा वादही चर्चेत

सागर भारुका यांचा यापूर्वी अकोला महापालिकेतील स्थायी समितीचे सभापती आणि भाजपचे ज्येष्ठ नेते विजय अग्रवाल यांच्यासोबत वाद झाला होता. या प्रकरणातही भारुका यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता खंडणीच्या आरोपात झालेल्या अटकेमुळे अकोला महापालिकेतील भाजप आणि शिवसेनेतील स्थानिक राजकीय संबंध पुन्हा चर्चेत आले आहेत. आज सागर भारुका यांना न्यायालयात हजर केल्यानंतर या प्रकरणातील पुढील कारवाईकडे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com