शिवसेनेत चापलुसांचीच चलती, निष्ठावान सैनिकांनी संपर्कप्रमुखांसमोर व्यक्त केला रोष !

कॉंग्रेस व इतर पक्षातून शिवसेनेत (Shivsena) आलेल्यांना कार्यकारिणीत विविध पदे दिली जातात. परंतु, अनेक वर्षांपासून सेनेत असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांचा विचारही केला जात नाही.
Shivsena
ShivsenaSarkarnama
Published on
Updated on

नागपूर : शहर शिवसेनेमध्ये (Shivsena) सर्वकाही आलबेल नाही, हे काल पुन्हा एकदा सिद्ध झाले. राज्यात शिवसेनेला येवढा मोठा धक्का बसला, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) पायउतार व्हावे लागले. तरीही श्रेष्ठींनी धडा घेतला नाही काय, असा प्रश्‍न शिवसैनिकांनी उपस्थित केला आहे. काल संपर्कप्रमुखांनी येथील शिवसेना भवनात बैठक घेतली. त्यामध्ये शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला.

कॉंग्रेस व इतर पक्षातून शिवसेनेत आलेल्यांना कार्यकारिणीत विविध पदे दिली जातात. परंतु, अनेक वर्षांपासून सेनेत असलेल्या निष्ठावंत शिवसैनिकांचा विचारही केला जात नाही. चापलूस पदाधिकाऱ्यांनाच मान मिळत असल्याबाबत शिवसैनिकांनी रविवारी रोष व्यक्त केला. त्यामुळे शहर शिवसेनेतही आलबेल नसल्याचे चित्र आहे. नागपूर (Nagpur) शहरातील कार्यकारिणीत लादल्या गेलेल्या पदाधिकाऱ्यांवर शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला.

शिवसेनेत मोठे बंड झाल्याने मुंबईवरून विविध मतदारसंघ संपर्कप्रमुख नागपुरात आले आहेत. रविवारी रेशीमबाग येथील शिवसेना भवनात त्यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. पूर्व नागपूरचे संपर्कप्रमुख नरेश बुरघाटे, मध्य नागपूरचे संपर्कप्रमुख रितेश राहाटे, उत्तर नागपूरचे संपर्कप्रमुख सूरज राठोड यांच्यासह जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया बैठकीला उपस्थित होते. यावेळी तिन्ही मतदार संघाच्या संपर्कप्रमुखांनी कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेतले. यावेळी शिवसैनिकांनी निष्ठावंत शिवसैनिकांना कार्यकारिणीतील पदांपासून वंचित ठेवण्यात आल्याचे काही शिवसैनिकांनी सांगितले.

राज्यात सरकार असताना निष्ठावंतांना कुठलेही पद, समिती देण्यात आली नाही. यावेळी संपर्कप्रमुखांनी त्यांची गाऱ्हाणी ऐकून घेतली. जिल्हाप्रमुख किशोर कुमेरिया यांनी संपर्कप्रमुखांनी शिवसैनिकांच्या मतांची दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्याचवेळी त्यांनी शिवसैनिकांनी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करावे, असे आवाहन केले.

Shivsena
शिवसेना संकटात ; १६ आमदारांनी व्हिप डावलून मतदान केल्याची अध्यक्षांकडून नोंद

कॉंग्रेसमधून आलेल्यांना पदे बहाल करण्यात आली. ज्यांनी पक्षासाठी कुठलेही काम केले नाही, ज्यांची हकालपट्टी करण्यात येणार होती, त्यांच्याकडेच प्रमुख पदे दिल्याने निष्ठावंतांनी नाराजी व्यक्त केली. ज्यांना पदे दिली गेली, त्यांच्या प्रभागात शिवसेनेची शाखाही नाही, असेही या शिवसैनिकांनी संपर्कप्रमुखांच्या लक्षात आणून दिले.

बैठकीला शहर संघटक किशोर पराते, सुरेखा गाडे, हरिभाऊ बानाईत, महेंद्र कठाणे, अंकुश कडू, राजेश कनोजिया, अजय दलाल, किशोर राठोड, सपना ठाकरे, महिमा राकेश दावधरिया, श्रावण खापेकर, चंद्रकांत कावरे, संदीप रियाल पटेल, शेखर खरवडे, प्रज्वल कडू, कौशिक येवले, आशिष चंद्रिकापुरे, रफीया अंजुम, वैशाली गजानन ठाकरे, उमेश निकम, संजय कसोधन, रोशन वानखेडे, जागेश्वर खापेकर, राजेश राजपांडे, समित कपाटे, अजय माने, दिलीप तुपकर, वैशाली उदापूरकर, तृप्ती पसिने, बबलू दरोडे, प्रदीप तुपकर, पितांबर घोलप, अमोध जांभूळकर, हरीश अचयेवार, देवेंद्र माहुरकर, प्रफुल लंडीये, माधुरी मौंदेकर व अनेक शिवसैनिक उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com