Sanjay Raut : पक्ष फोडणे भाजपच्या कुठल्या आयडॉलॉजीत बसते? संजय राऊतांचा खडा सवाल

Sanjay Raut on government : उद्धव ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. पक्ष फोडणे हे भाजपच्या कुठल्या आयडॉलाजीत बसते असा खडा सवाल त्यांनी केला.
Sanjay Raut
Sanjay Raut Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : राजकारणात आता काही शक्य-अशक्य असे काही राहिले नाही. काहीही होऊ शकते या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याने सध्या राज्याच्या राजकारणात चांगलीच खळबळ उडाली आहे. त्यांच्या या विधानाचा उद्धव ठाकरे सेनेचे नेते संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. पक्ष फोडणे हे भाजपच्या कुठल्या आयडॉलाजीत बसते असा खडा सवाल त्यांनी केला.

विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केलेल्या कामाची प्रशंसा शरद पवार यांनी केली होती. त्यामुळे ते आता आघाडी सोडणार आणि महायुतीत सहभागी होणार अशा चर्चा रंगल्या आहेत. याबाबत एका मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांना विचारणा करण्यात आली असता त्यांनी राजकारणात काही अशक्य असे राहिले नसल्याचे सांगितले. अजित पवार आमच्यासोबत येतील आणि उद्धव ठाकरे काँग्रेससोबत (Congress) जातील असे यापूर्वी कोणाला वाटले नव्हते.

मात्र तसे घडले आहे. हे बघता शरद पवार आमच्याकडे येतील की नाही हे ठामपणे सांगता येत नसल्याचे उत्तर त्यांनी दिले होते. हाच धागा पकडून संजय राऊत म्हणाले, कोण कुठे जाणार आणि कुठे येणार हे आमचे मित्र देवेंद्र फडणीस (Devendra Fadnavis) ठरवणार नाही. प्रत्येक पक्षाची एक भूमिका ठरली असते. आयडॉलॉजी असते. पक्ष फोडणे हे भाजपच्या कुठल्या आयडॉलाजीत बसते हे आधी फडणवीस यांनी स्पष्ट करावे असेही ते म्हणाले.

Sanjay Raut
Manikrao Kokate On Bhujbal : भुजबळांवर बोलू नका; माणिकराव कोकाटेंना राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींचा आदेश

भाजपने (BJP) आमच्या पक्षाला तोडले. राष्ट्रवादी काँग्रेससुद्धा फोडली. हा इतिहास आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आम्ही नेहमी संस्कार आणि संस्कृती पाळली आहे. जे सरकार चांगले काम करते त्यांच्याकडे विरोधी पक्षाने सकारात्मक दृष्टीने पाहिले पाहिजे. ही आमचीसुद्धा भूमिका आहे. म्हणूनच देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीमध्ये जे काम सुरू केले त्याची आम्ही स्तुती केली. व्यक्तिगत शत्रुत्व न ठेवता राजकारण केले पाहिजे अशी परंपरा महाराष्ट्रात राहिली आहे. मात्र ती परंपरा दुर्दैवाने भाजपने मोडली होती. हेसुद्धा त्यांनी मान्य केलेच पाहिजे.

Sanjay Raut
MVA Politics : "चुकीच्या निर्णयासोबत जाणार नाही..." ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अमान्य

राजकारणात कोणी कायमचा शत्रू किंवा मित्र नसतोच. आम्ही २५ वर्ष मित्रच होतो. आम्ही भाजपचा सर्वात विश्वासपात्र मित्र होतो. मात्र आता मित्र राहिलो नाही. महाराष्ट्रात अनेक दिग्गज नेते होऊन गेले. त्यांनी कधी सुडाचे राजकारण केले नाही. केंद्रीय तपास यंत्रणेचा वापर केला नाही. विरोधकांना तुरुंगवास भोगायला लावला नाही. याची सुरुवात महाराष्ट्रात भाजपने केली. ते आता सुधारणार असतील तर आम्ही त्यांचे स्वागत करू असेही संजय राऊत म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com