Uddhav Thackeray : सरकारला पेन्शनसाठी 'टेन्शन' देण्याची गरज; कर्मचाऱ्यांच्या खांद्यावरून ठाकरेंचा निशाणा

Old Pension Scheme : आमचं सरकार आलं की जुनी पेन्शन योजना सुरू करणार : उद्धव ठाकरे
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Nagpur Winter Session 2023 : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांकडून जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीसाठी आज नागपुरात महामोर्चा काढण्यात आला. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी काढलेल्या या मोर्चामध्ये सहभागी होत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा जाहीर केला.

'कर्मचाऱ्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असेल तर सरकारला टेन्शन देण्याची वेळ आली आहे. आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर कर्मचाऱ्यांना पुन्हा जुनी पेन्शन योजना लागू करण्यात येईल,' असे आश्वासन ठाकरे यांनी दिले आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे देखील उपस्थित होते.

Uddhav Thackeray
Nagpur Winter Session : ईडीच्या तावडीतून अद्याप सुटलेलो नाही; उगाच अफवा नको!

जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांकडून सातत्याने मोर्चे, आंदोलने केली जात आहेत. त्याच मागणीसाठी नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या काळात सरकारचे जुन्या पेन्शन योजनेच्या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी नागपुरात महामोर्चा काढला.

यावेळी नागपुरातील यंशवतराव चव्हाण स्टेडिअमवर हजारोंच्या संख्येने सरकारी कर्मचाऱ्यांनी उपस्थिती लावली. दरम्यान, कर्मचाऱ्यांच्या मोर्चामध्ये सहभागी होत उद्धव ठाकरे यांनी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन योजना सुरू करण्याच्या मागणीला पाठिंबा दिला.

Uddhav Thackeray
Drug Mafia Lalit Patil : ललित पाटील कायम हॉस्पिटलमध्येच राहिला!, फडणवीसांची धक्कादायक माहिती

ठाकरे म्हणाले, 'गद्दारांनी गद्दारी करुन आपले सरकार पाडले. मी मुख्यमंत्री असतो तर सरकारी कर्मचाऱ्यांना अशा पद्धतीने आंदोलन करण्याची वेळच आली नसती. मात्र आमचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही कर्मचाऱ्यांना जुनी पेंशन योजना लागू करू,' असे आश्वासनही त्या दिले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाकरेंनी एकनाथ शिंदे गटावर टीकाही केली. 'सरकारी कर्मचारी हे सरकार म्हणून आमचा चेहरा असतात. सरकारच्या कागदावरच्या घोषणा प्रत्यक्षात आणण्याचे काम हे कर्मचारी करत असतात. मात्र, अशा महत्त्वाच्या कर्मचारी घटकाला स्वतःच्या मागणीसाठी आंदोलन करावे लागते, हे दुर्दैव आहे. तसेच आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असेल तर सरकारला पेन्शनसाठी टेंशन देण्याची गरज आहे,' असे मत उद्धव ठाकरेंनी व्यक्त केले.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray
Rajasthan CM : ‘सरप्राईज’साठी तयार राहा! भाजप आमदाराचे संकेत अन् चर्चांना उधाण

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com