Sandip Shelke News: ठाकरेंच्या सेनापतीची काँग्रेससोबत 'हात' मिळवणी; विदर्भात 'मशाल' विझली

Vidarbha Congress Politics Sandip Shelke Joins Congress: शेळके यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे उद्धवसेनेला बुलढाणा जिल्ह्यात मोठा राजकीय फटका बसणार आहे.जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली.
Vidarbha Congress Politics Sandip Shelke Joins Congress
Vidarbha Congress Politics Sandip Shelke Joins Congress:Sarkarnama
Published on
Updated on

Sandeep Shelke Joins Congress: ‘वन बुलढाणा मिशन’चे प्रणेते, शाहू परिवाराचे सर्वेसर्वा संदीप शेळके यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 'मशाल'सोडून काँग्रेसचा 'हात' धरला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत त्यांनी मुंबईमध्ये पक्षप्रवेश केला आहे.काँग्रेसला बुलढाण्यातून संदीप शेळके यांच्या रूपाने एक मोठा आर्थिक आणि सामाजिक आधार असलेला नेता गळाला लागला आहे.

संदीप शेळके उद्धवसेना सोडणार असल्याच्या चर्चांना गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात उधाण आले होते. अखेर त्यांनी जिल्हा समन्वयक पदाचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये जाणे पसंत केले आहे. त्यामुळे ते कोणत्या पक्षात जाणार या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.

शेळके यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे उद्धवसेनेला बुलढाणा जिल्ह्यात मोठा राजकीय फटका बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.जिल्ह्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. बुलढाण्यातील या राजकीय भूकंपाने नव्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे. शेळके यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागण्याचे संकेत मिळत आहेत.आगामी विधानसभा निवडणुकीत शेळके हे काँग्रेसचे प्रबळ दावेदार असतील, हे हर्षवर्धन सपकाळ यांच्या भाषणानंतर स्पष्ट झाले आहे.

सपकाळ यांनी “संदीप शेळके हे कष्टाळू कार्यकर्ते असून त्यांनी आता बुलढाणा विधानसभा मतदारसंघ पिंजून काढावा,” असे सांगत ते आमदारकीचे प्रबळ दावेदार असल्याचे प्रत्यक्षपणे सांगितले आहे.

Vidarbha Congress Politics Sandip Shelke Joins Congress
Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण होणार ‘लखपती’; बिनव्याजी कर्ज मिळणार! जामीनदार, CIBILस्कोअरची अट नाही; संपूर्ण प्रक्रिया जाणून घ्या!

जिल्ह्याचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते राहुल बोंद्रे, प्रदेश उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनीही शेळके यांच्या प्रवेशाचे स्वागत केले आहे. या सोहळ्याला काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते सचिन सावंत, अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीअंबीरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

Vidarbha Congress Politics Sandip Shelke Joins Congress
LPG Gas News: महत्वाची बातमी: देशभरात एस्मा लागू! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत पुन्हा नियम बदलले! नवे नियम काय?

शेळके म्हणाले, "महापुरुषांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी काँग्रेसची वाट निवडली. काँग्रेस हा शोषित-वंचित घटकांना न्याय देणारा पक्ष असून संविधानाला सर्वोच्च मानणाऱ्या विचारधारेतून काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे," " पक्षासाठी झोकून काम करण्याचे आश्वासन देत त्यांनी “कहो फिरसे… काँग्रेस दिलसे” असा नारा दिला आहे.शेळके यांनी जुलै 2024 मध्ये मुंबईस्थित ‘मातोश्री’ येथे उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून हाती ‘मशाल’ घेतली होती.

Vidarbha Congress Politics Sandip Shelke Joins Congress
Pune Crime News: पुण्यात अमानुषतेचा कळस! तरुणाला मारहाण करून शेण खाऊ घातले; व्हिडीओ व्हायरल

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com