
Sanjay Gaikwad News: एकनाथ शिंदे यांचे फायर ब्रँड नेते, नवनियुक्त आमदार संजय गायकवाड यांनी आपल्याच पक्षाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव आणि भाजपचे आमदार संजय कुटे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. गायकवाड यांचा अवघ्या 800 मतांनी विजय झाला. कमी मताधिक्यमुळे गायकवाडांनी प्रतापराव जाधवांना टार्गेट केले.
संजय गायकवाड म्हणाले, मी एकटा लढलो. माझ्यासोबत कुणीही नव्हते. भाजपने माझ्या विरोधात उमेदवार ठरवला. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी माझ्या विरोधातील उमेदवाराचे काम केले.
गायकवाड यांनी थेट आपल्याच केंद्रीय मंत्र्यावर आरोप केल्याने बुलढाण्यामध्ये जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ माजली आहे. गायकवाड यांनी भाजपवर देखील टीका केली आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यावर काय निर्णय घेतात याकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
संजय गायकवाड यांच्या विरोधात शिवेसना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून जयश्री शेळके मैदानात होत्या. या दोघांमध्ये थेट लढत झाली. जयश्री शेळके यांना 90 हजार 819 मतं मिळाली तर संजय गायकवाड यांना 91 हजार 660 मते मिळाली. अवघ्या 841 मतांनी संजय गायकवाड विजयी झाले.
सत्तास्थापनेसाठी मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती मिळवण्यासाठी एकनाथ शिंदे यांच्याकडून प्रयत्न केले जात आहेत. गृहमंत्रिपदासाठी शिंदे आग्रही आहेत. मात्र, मुख्यमंत्रिपदासोबत गृहमंत्रिपद देखील भाजपला आपल्याकडे हवे आहे. गृहमंत्रिपदाच्या रस्सीखेच सुरू असताना एकनाथ शिंदे आज आचनाक आपल्या सातारा जिल्ह्यातील दरे गावात आरामासाठी पोहोचले. त्यामुळे शिंदे नाराज असल्याच्या चर्चा आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.