Kishori Pednekar
Kishori PednekarSarkarnama

ShivsenaUBT Kishori Pednekar : 'त्या' मुलीला ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलं दत्तक; नेमकं प्रकरण काय?

Kishori Pednekar : स्त्री शक्ती संवाद कार्यक्रमासाठी किशोरी पेडणेकर नागपूरल्या आहेत. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेनं मुलीला घेतलं दत्तक.नेमकं प्रकरण काय?
Published on

Nagpur News : नागपूरमधील पारडी भागात अत्याचार झालेल्या चिमुरड्या मुलीसह तिच्या कुटुंबाला दत्तक घेण्याचा निर्णय उद्धव ठाकरे शिवसेनेच्यावतीने (Shivsena UBT) घेण्यात आला. शिवसेनेच्या नेत्या व मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली.

स्त्री शक्ती संवाद कार्यक्रमासाठी किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) नागपूरल्या आहेत. पूर्व नागपूरमधील पारडी येथे मुलीवर अत्याचार झाल्याची त्यांना माहिती देण्यात आली. त्यांनी मुलींच्या घरी जाऊन तिच्या कुटुंबीयांसोबत चर्चा केली. त्यांना धीर दिला. सोबतच मुलीच्या लग्नापर्यंत तिच्या कुटुंबीयांचे पालनपोषण उद्धव सेनेच्यावतीने करण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

Kishori Pednekar
Assembly Election 2024 : नागपुरातील तीन मतदारसंघात सांगली ‘पॅटर्न'चा धोका

'आम्ही जे बोलतो ते करतो असेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी धारवीमध्ये घडलेल्या घटनेची माहिती नसली तरी जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न भाजप करीत असल्याचा आरोप केला. धारावीत एकतर हिंदू राहील किंवा मुस्लिम राहतील अशी टोकाची भूमिका भाजपने घेतली आहे. त्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला आहे. धारावीचा विकास गुण्यागोविंदाने झाला पाहिजे. अनेक वर्षांपासून धारावीत राहत असलेल्या रहिवाशांचे पुनर्वसन झाले पाहिजे.

Kishori Pednekar
Narendra Modi News : काँग्रेसला गणेशोत्सवाची चीड आहे का? पीएम मोदींनी केली विचारणा

धार्मिक स्थळांना संरक्षण दिले पाहिजे. सर्वांना विश्वासात घेऊन पुनर्वसन व धारावीचा विकास झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. प्रत्येक निवडणुकीतच सत्ताधाऱ्यांनी हस्तक्षेप करणे सुरू केले आहे. पराभवाच्या भीतीने विधानसभेची निवडणूक समोर ढकलण्यात आली आहे. आता दोन दिवसांवर सिनेटची निवडणूक असताना ती रद्द करण्यात आली आहे. असे प्रथमच घडत आहे. सिनेट निवडणुकीचे काम मुख्यमंत्री आणि राज्यपाल बघतात. असे असले तर विद्यापीठाचे कारभार बघणाऱ्यांनी त्यांची बुद्धी गहाण टाकली का असा सवालही किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com