Nagpur News, 25 Sep : महाविकास आघाडीचे सरकार पाडण्यासाठी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दबाव आणला होता. असा आरोप करून खळबळ उडवून देणारे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संयोजक प्रा. श्याम मानव (Shyam Manav) हे महायुतीच्या पराभवासाठी पुन्हा ‘संविधान बचाव-महाराष्ट्र बचाव' अभियान राबवणार आहेत.
विशेष म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीत याच मुद्याने महायुतीला जेरीस आणले होते. लोकसभेच्या निवडणुकीपूर्वीसुद्धा हे अभियान राबवण्यात आले होते. लोकसभेच्या निवडणुकीत प्रामुख्याने विदर्भात महायुतीचा झालेला पराभवात विविध पुरोगामी सामाजिक संघटनांचा मोठा हातभार असल्याचा दावाही त्यांनी यापूर्वी केला होता.
आता पुन्हा नव्या जोमाने हे अभियान राबवण्यात येणार आहे. पक्षांतर बंदी कायद्यानुसार विद्यमान सरकार सत्तेत राहू शकत नाही. परंतु, या प्रकरणात न्यायालयाने दिलेला निर्णय सर्वांना माहीती आहे. ते 'मॅनेज' झाले आहे. तर अनेक भोंदू बाबा, तथाकथित महाराज महाराष्ट्रात लोकांची फसवणूक करीत आहेत.
परंतु, सरकार त्यांच्यावर कारवाई करीत नाही. उलट त्यांना वेगवेगळ्या शहरात फिरवले जाते. केंद्रात भाजप (BJP) 240 जागांवर थांबले, यामुळे सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांविरुद्ध अर्थात आमच्या विरोधात कारवाई झाली नाही, नाहीतर आम्ही जेलमध्ये पोहचलो असतो, असंही श्याम मानव म्हणाले.
यावेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या विधानाला वेगळ्या अर्थाने समाजासमोर सादर करण्यात आल्याचेही श्याम मानव यांनी सांगितले. सध्या सांप्रदायिकतेच्या विळख्यात महाराष्ट्र अडकवला आहे. यामुळे महायुतीच्या विळख्यातून महाराष्ट्र मुक्त करण्याची गरज असल्याचं ते म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्रात महायुती (Mahayuti) सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना चांगली आहे. या योजनेतून स्वयंरोजगार वाढण्याची शक्यता आहे. ही योजना काँग्रेस सरकारने तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये आधीच महालक्ष्मी नावाने सुरू केली.
तेलंगणामध्ये महिलांना अडीच हजार तर कर्नाटकमध्ये दोन हजार रुपये महिलांना मिळत आहेत. महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यास यात दोन हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याची शिफारस माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.