Harshvardhan Sakpal : सद्‌भावना यात्रेसाठी येणारे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ नागपूर काँग्रेसमध्ये करणार महत्वपूर्ण ऑपरेशन!

Congress Sadbhavana Yatra : दिल्लीतील बैठक आणि अहमदाबाद येथील अधिवेशनातही काँग्रेसच्या अनेक जिल्हाध्यक्षांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. त्याची दखल घेऊन संघटनेची बांधणी व कार्यशैलीत मोठे बदल केले जाणार असल्याचे नेत्यांनी सांगितले. सद्‍भावना यात्रेच्या माध्यमातून नवे बदल जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.
Harshvardhan Sakpal
Harshvardhan SakpalSarkarnama
Published on
Updated on

Nagpur, 10 April : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झालेले हर्षवर्धन सपकाळ अद्याप नागपूमध्ये आले नाहीत. ते केव्हा येणार याची प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे. नागपूरमध्ये औरगंजेबाच्या कबरीच्या विरोधात झालेल्या आंदोलनावरून उसळलेली दंगल आणि त्यामुळे दोन धर्मांमध्ये निर्माण झालेले वितुष्ट दूर करण्यासाठी काँग्रेसने सदभावना यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या यात्रेत प्रदेशाध्यक्ष सहभागी होणार आहेत. येत्या १६ एप्रिल रोजी ही यात्रा नागपूरमध्ये आयोजित करण्यात आली आहे. या सद्‌भावना यात्रेच्या निमित्ताने शहरात येणारे प्रदेशाध्यक्ष सपकाळ हे पक्षसंघटनेतही महत्वपूर्ण बदल (ऑपरेशन) करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sakpal ) विदर्भात आले. वर्धा येथील महात्मा गांधी यांच्या आश्रमाला त्यांनी भेटही दिली. मात्र, ते नागपूरमध्ये आले नव्हते. आता संवाद यात्रेचा माध्यमातून ते काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत संवाद साधणार आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव झाला होता. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजीनामा दिला होता. त्यांची जागा सपकाळ यांना देण्यात आली आहे.

विधानसभेत झालेल्या पराभवामुळे काँग्रेसचे (Congress) कार्यकर्ते सुस्तावले आहेत. त्यांना पुन्हा सक्रिय करण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. दरम्यान, प्रदेशाध्यक्षांनी सर्व जिल्ह्यात निरीक्षक नेमले आहेत. विद्यामान जिल्हाध्यक्ष आणि शहराध्यक्ष तसेच कार्यकारिणीचा आढावा घेऊन त्यांनी पंधरा दिवसांत रिपोर्ट सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या रिपोर्टच्या आधारावर नव्या अध्यक्षांची नियुक्ती केली जाणार असल्याचे समजते.

Harshvardhan Sakpal
Shiv sena UBT : उद्धव ठाकरेंचा फोटो फाडत सोलापूर उपशहरप्रमुखाने दिला शिवसेनेचा राजीनामा; म्हणाले, ‘अशा हिंदुत्ववादी नेत्याचा निषेध करतो...’

दरम्यान, दिल्ली येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्षांना कार्यकारिणी निवडण्याचे अधिकार देण्यात येणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे नव्या कार्यकारिणीत आपला नंबर लागावा याकरिता कार्यकर्तेसुद्धा सक्रिय होणार असल्याचे दिसून येत आहे. काँग्रसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी शहरात दाखल होणार आहेत.

दिल्लीतील बैठक आणि अहमदाबाद येथील अधिवेशनातही काँग्रेसच्या अनेक जिल्हाध्यक्षांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. कुठल्याही महत्त्वाच्या निर्णयात विश्वासात घेतले जात जात नाही, बोलण्याची संधीही दिल्या जात नसल्याचे अनेकांनी सांगितले. त्याचीही दखल घेऊन संघटनेची बांधणी व कार्यशैलीत मोठे बदल केले जाणार असल्याचे नेत्यांनी सांगितले. सद्‍भावना यात्रेच्या माध्यमातून नवे बदल जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

Harshvardhan Sakpal
Sangola Politic's : उपमुख्यमंत्री शिंंदेंसह पाच मंत्री आज सांगोल्यात; शहाजीबापूंच्या विधान परिषदेचा शब्द जाहीरपणे मिळणार?

दिल्लीतील बैठक आणि अहमदाबाद येथील अधिवेशनातही काँग्रेसच्या अनेक जिल्हाध्यक्षांनी आपल्या समस्या मांडल्या आहेत. त्याची दखल घेऊन संघटनेची बांधणी व कार्यशैलीत मोठे बदल केले जाणार असल्याचे नेत्यांनी सांगितले. सद्‍भावना यात्रेच्या माध्यमातून नवे बदल जाहीर केले जाणार असल्याचे सांगण्यात येते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com