Sujat Ambedkar News : बाबासाहेबांपासून काँग्रेसचा आंबेडकर कुटुंबाला त्रास, आता आनंदराज... ; सुजात आंबेडकरांचा वार!

Lok Sabha ELection News : आपण काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही. काँग्रेस हीच भाजपची खरी बी टीम आहे, असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला.
Sujat Ambedkar News : बाबासाहेबांपासून काँग्रेसचा आंबेडकर कुटुंबाला त्रास, आता आनंदराज... ; सुजात आंबेडकरांचा वार!
Sarkarnama
Published on
Updated on

Vashim News : वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी काँग्रेस हीच भाजपची बी टीम असल्याचा खळबळजनक आरोप वाशीममध्ये बोलताना केला. सम्यक जनता पार्टीचे उमेदवार प्राध्यापक अनिल राठोड यांच्या प्रचारार्थ उकळीमध्ये ही सभा आयोजित करण्यात आली होती. या वेळी त्यांनी हा आरोप केला आहे. (Latest Marathi News)

ज्या काँग्रेसने भंडाऱ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना त्रास दिला. त्याच काँग्रेसने अकोल्यात प्रकाश आंबेडकर यांनादेखील त्रास दिला आहे. यानंतर आता अमरावतीमध्ये आनंदराज आंबेडकर यांना पाडण्यासाठी ही एकमेव बौद्ध उमेदवार उभा केला असल्याचा आरोपदेखील त्यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sujat Ambedkar News : बाबासाहेबांपासून काँग्रेसचा आंबेडकर कुटुंबाला त्रास, आता आनंदराज... ; सुजात आंबेडकरांचा वार!
Prakash Ambedkar News : प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप; 'मोदींच्या कार्यकाळात 17 लाख कुटुंबांनी देश सोडला..!'

"या काँग्रेसने बौद्ध समाजातून आंबेडकरवादी असा एकच उमेदवार दिला आणि तोदेखील अमरावतीमध्ये दिला आहे. आनंदराज आंबेडकरांना पाडण्यासाठीच ही उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना भंडारामध्ये त्रास दिला. याच काँग्रेसने भैयासाहेबांना नांदेडमध्ये (Nanded) त्रास दिला. या काँग्रेसने बाळासाहेबांना अकोल्यामध्ये त्रास दिला आणि 2024 च्या निवडणुकीत हीच काँग्रेस आनंदराज आंबेडकर यांना अमरावतीमध्ये त्रास देत आहे, या परिस्थितीत आपण काँग्रेस सोबत जाऊ शकत नाही. काँग्रेस हीच भाजपची खरी बी टीम आहे, असा आरोप सुजात आंबेडकर यांनी केला.

Sujat Ambedkar News : बाबासाहेबांपासून काँग्रेसचा आंबेडकर कुटुंबाला त्रास, आता आनंदराज... ; सुजात आंबेडकरांचा वार!
Sujat Ambedkar : यंदा कर्तव्य आहे' का? वंचितचे युवा नेते सुजात आंबेडकरांनी दिले 'हे' खास उत्तर

बाळासाहेब आंबेडकरांनी (Prakash AMbedkar) त्यांना तीन ते चार वेळा संपर्क करण्याचा प्रयत्न केला. दोन वेळा पत्रे लिहिली. इंडिया आघाडीला आपण खुले पत्रही लिहिले होते. जर आम्ही भाजपची 'बी टीम' असतो तर पत्र लिहिलं असतं का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com