NCP Politics : राष्ट्रवादी काँग्रेसला वाटणारी भीती खरी ठरणार; तटकरेंच्या दाव्यानं कार्यकर्त्यांची झोप उडवली

Sunil Tatkare Statement NCP: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आम्ही महायुतीनेच लढणार असल्याचे सांगितले असले तरी जागा वाटपावर मात्र त्यांनी सावध वक्तव्य केले. हे बघता नागपूर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला वाटणारी भीती अधोरेखित झाली आहे.
Sunil Tatkare
Sunil TatkareSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: महापालिका, जिल्हा परिषदेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती कायम राहील का? महायुती झाल्यास नागपूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला किती जागा येतील असा प्रश्न सर्वांना सतावत आहे. नागपूर शहरात भाजपचे प्राबल्य आहे. त्यामुळे युती होणार नाही आणि झाल्यास राष्ट्रवादीसाठी चार दोन जागा सोडल्या जातील अशी भीती कार्यकर्त्यांना सतावत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी आम्ही महायुतीनेच लढणार असल्याचे सांगितले असले तरी जागा वाटपावर मात्र त्यांनी सावध वक्तव्य केले. हे बघता नागपूर महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसला वाटणारी भीती अधोरेखित झाली आहे. तटकरे म्हणाले, कोणाला किती जागा द्यायच्या यापेक्षा मेरिट महत्त्वाचे आहे. जिंकून येण्याची क्षमता बघूनच जागा वाटपाचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वीच्या नागपूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) एकसंध असताना एकच उमेदवार निवडून आला होता. तोसुद्धा शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत आहे. सध्याच्या घडीला दोन माजी नगरसेवक राष्ट्रवादीत आहे. यापैकी आभा पांडे या अपक्ष निवडून आल्या होत्या तर राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेश सचिव तानाजी वनवे हे त्यावेळी काँग्रेस पक्षात होते.

150 पैकी भाजपचे 108 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे उर्वरित जागेवरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा विचार केला जाईल. हे बघता पांडे आणि वनवे यांच्यासाठी जागा सोडल्या जातील. इतररांना उमेदवारी देताना भाजप आजवर जिंकू शकली नाही अशा प्रभागात जागा सोडल्या जातील, अशी शंका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आहे.

Sunil Tatkare
Jayant Patil News: जयंत पाटलांचा शरद पवारांविषयी मोठा दावा; म्हणाले,' राज्यातील लोकांना सरकारपेक्षा...

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहर अध्यक्ष व विद्यमान प्रदेश सचिव प्रशांत पवार यांनी 40 जागांवर दावा केला होता. यापैकी किमान 20 ते 30 उमेदवारांमध्ये जिंकण्याची क्षमता असल्याचा दावा त्यांनी केला होता. दोनचार जागांवर युती करण्यापेक्षा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसने स्वबळावर महापालिकेची निवडणूक लढावी अशी भूमिका अजित पवार यांच्या समक्ष मांडली होती.

नागपूरमध्ये महायुती करताना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा बळी देऊ नका अशी विनंतीही त्यांनी केली होती. त्यांच्या ४० जागेच्या मागणीवरून मोठा वाद झाला होता. भाजपच्या एका नेत्याने राष्ट्रवादीला अंथरूण पाहून पाय पसरावे असा सल्ला दिला होता.

Sunil Tatkare
Chandrakantdada on Vote Chori : महाराष्ट्र अन्‌ यूपीत त्यावेळी तुम्ही मतचोरी केली होती का?; चंद्रकांतदादांचा राहुल गांधींना सवाल

आज प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी जागा वाटपावरून व्यक्त केलेले मत बघता राष्ट्रवादी आपले अंथरूण पाहूनच जागेची मागणी करणार असल्याचे दिसून येते. राष्ट्रवादीच्या अनेक नेत्यांनीसुद्धा 10 जागेपेक्षा अधिक नगरसेवक निवडून येण्याची आमच्या पक्षाची क्षमता नसल्याचे खासगीत मान्य केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com