Chandrapur Politics: प्रतिभा धानोरकर लोकसभेच्या मैदानात एन्ट्री करणार ? मोर्चेबांधणी सुरू

Pratibha Dhanorkar : प्रतिभा धानोरकर यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत.
Pratibha Dhanorkar
Pratibha Dhanorkar Sarkarnama
Published on
Updated on

Chandrapur News: महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर लोकसभेत महाराष्ट्रातून काँग्रेसचा एकही खासदार नाही. आता पक्षातील आणि पक्षाबाहेरील अनेकांना लोकसभेची स्वप्नं पडायला लागली आहेत. याच दृष्टीने काही नेत्यांनी मोर्चेबांधणीही सुरू केली.

दुसरीकडे आमदार प्रतिभा धानोरकर यांनी दुःखातून सावरत नव्या दमाने कामाला सुरुवात केली आहे. त्यामुळे चंद्रपूर-आर्णी लोकसभा निवडणुकीच्या मैदानात प्रतिभा धानोरकर एन्ट्री करणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

गेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसचे पाणीपत झाले, पण या वेळी बाळू धानोरकर यांनी मोदी लाटेतदेखील विजय मिळवत पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधले. त्यामुळे धानोरकर यांची राज्यात मोठी चर्चा झाली. महाराष्ट्रात काँग्रेसचे एकमेव खासदार असल्याने धानोरकरांचे महत्त्व कमालीचे वाढले, पण काही महिन्यांअगोदर त्यांचे आजाराने निधन झाले.

Pratibha Dhanorkar
Marathwada Cabinet Meeting : हे तर असं झालं, `गणपती आले आणि नाचून गेले`, राऊतांकडून मुख्यमंत्र्यांची खिल्ली...

खासदार धानोरकरांच्या निधनाने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. या कठीण प्रसंगाला त्या सावरू शकणार नाहीत, असे अनेकांना वाटत होते. पण त्यांनी अतिशय कणखरपणे बाळू धानोरकरांचे स्वप्न साकारण्यासाठी आपण जिवाची बाजी लावणार असल्याचे शोकसभेतच सांगितले होते. पतीच्या निधनाने खचून न जाता त्या आता पुन्हा नव्या दमाने कामाला लागल्या आहेत.

बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबीयांना काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी त्यांना दिल्लीला बोलावून घेत हिंमत दिली. खासदार असताना बाळू धानोरकर यांनी भव्य दांडिया महोत्सवाचे आयोजन केले होते. आतादेखील आमदार प्रतिभा धानोरकर यांनी अशाच कार्यक्रमाचे नियोजन केले. कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, पक्षाला बळकटी देणारे विविध उपक्रम राबविणे असे काम त्यांनी आता सुरू केले आहे.

बाळू धानोरकर यांच्यानंतर चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचा उमेदवार कोण असेल, याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू आहेत. यातच लोकसभा मतदारसंघात प्रतिभा धानोरकर यांनी सुरू केलेले काम, वाढविलेले दौरे हे लक्षात घेता, त्या लोकसभा निवडणुकीच्या मैदानात एन्ट्री करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Edited by - Ganesh Thombare

Pratibha Dhanorkar
UP BJP District President: लोकसभेसाठी भाजपची नवी रणनीती; ७१ पदाधिकाऱ्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com