Tension in Akola, Buldhana, Amravati : सोशल मीडिया पोस्टनंतर बुलडाणा, अमरावती जिल्ह्यांत तणाव, अकोल्यात वादानंतर दगडफेक

Police Force Deployed : तामगावातून एकास अटक, अकोल्यातील अकोटफैलात बंदोबस्त वाढवला
Tension in Buldhana District.
Tension in Buldhana District.Sarkarnama
Published on
Updated on

Crime News : सोशल मीडियावरील पोस्टनंतर बुलडाणा जिल्ह्यात तणाव निर्माण झाला आहे. खामगाव, चिखली व जळगाव जामोद तालुक्यांमध्ये या घटनेचे तीव्र पडसाद उमटले आहेत. तीन दिवसांपूर्वी संग्रामपूर येथून ही पोस्ट व्हायरल झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तामगाव पोलिसांनी या प्रकरणी एकास अटक केली होती. मंगळवारी (ता. २१) ही आक्षेपार्ह पोस्ट पुन्हा व्हायरल झाल्यानंतर तणाव निर्माण झाला. सध्या जिल्ह्यातील खामगाव, चिखली, जळगाव जामोद, बोरी आडगाव येथील पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. बोरी अडगाव येथे टायर जाळत रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं.

बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागात बंदोबस्त वाढविण्यात आल्यानंतर तणावपूर्ण शांतता होती. वरिष्ठ पोलिस अधिकारी खामगाव, चिखली व जळगाव जामोद तालुक्यावर लक्ष ठेऊन आहेत. खामगाव तालुक्यातील बोरी आडगाव येथे टायर जाळत रास्तारोको केल्यानंतर येथेही दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले. मंगळवारी घडलेल्या घटनेप्रकरणी खामगाव ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काही आरोपींना घेतल ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी ‘सरकारनामा‘शी बोलताना सांगितले. (Tension Created in Khamgaon, Chikhli, Jalgaon Jamod of Buldhana District after social media post gone viral police force stepped up also in Akola after Stone Pelting)

Tension in Buldhana District.
Akola Water Supply : राजकीय मतभेद विसरत पाण्याच्या मुद्द्यावर खारपाणपट्ट्यातील सरपंच एकवटले

अमरावतीच्या रिद्धपुरातही तणाव

बुलडाणा जिल्ह्यातील वादग्रस्त पोस्ट सोशल माध्यमांवर व्हायरल होत अमरावती जिल्ह्यात पोहोचली. त्यामुळं अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर गावातही तणाव निर्माण झाला. घटनेच्या निषेधार्थ रिद्धपूर ‘गाव बंद’ची हाक देण्यात आली आहे. गावातील सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. अमरावती ग्रामीण पोलिसांनी रिद्धपूर गावातील बंदोबस्तात वाढ केली आहे. पोस्ट व्हायरल करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राष्ट्रीय श्रीराम सेनाच्यावतीने अमरावती जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांना निवेदन देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयात या प्रकाराचा निषेध करत दोषींवर कडक कारवाईची मागणी करण्यात आली.

यावेळी बोलताना राष्ट्रीय श्रीराम सेनेचे पदाधिकारी म्हणाले की, जातीय तणाव निर्माण करण्यासाठी जाणीवपूर्वक सोशल माध्यमांवर समाजकंटक पोस्ट व्हायरल करीत आहे. हा प्रकार पूर्वनियोजित षडयंत्राचा भाग वाटत आहे. त्यामुळे प्रशासनानं असे कृत्य करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करणे नितांत गरजेचे आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

अकोल्यात दगडफेकीनंतर शांतता

अकोला शहरातील अकोटफैल भागात वादातून दोन समुदायातील गट समोरासमोर आलेत. त्यानंतर दगडफेक झाली. सोमवारी (ता. २१) रात्री उशिरा ही घटना घडली. हा प्रकार नेमका कशामुळं झाला, याबद्दल वेगवेगळ्या चर्चा होत्या. अकोल्याचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी याबाबत सांगितले की, दोन समुदायातील दोन परिवारांमध्ये वाद चिघळल्यानंतर दगडफेक झाली होती. सध्या परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. अकोल्यात पूर्णपणे जनजीवन सुरळीत असल्याचं त्यांनी सांगितलं. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घटनेची माहिती घेतली. दगडफेक करणाऱ्यांविरुद्ध कारवाईचे आदेश त्यांनी अकोला पोलिसांना दिले आहेत.

Edited by : Prasannaa Jakate

Tension in Buldhana District.
Akola Rape : क्रूरतेचा कळस! सिगारेटचे चटके देत अल्पवयीन मुलीवर बलात्कार, मुंडनही केले... ‘वंचित’चा पोलिस ठाण्यात ठिय्या

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com