Shivsena Shinde Group : ठाकरे गटाचा तडकाफडकी राजीनामा देणाऱ्या शिल्पा बोडखेंचा शिवसेनेत प्रवेश

Shilpa Bodkhe join Shiv Sena : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला.
CM Shinde
CM Shinde Sarkarnama
Published on
Updated on

Mumbai Political News : ठाकरे गटाच्या पूर्व विदर्भ महिला आघाडी संपर्कप्रमुख व पक्षाच्या प्रवक्त्या शिल्पा बोडखे यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचा राजीनामा दिला होता. राजीनामा देतेवेळी बोडखे यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केले होते. आता शिल्पा बोडखे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वर्षा या निवासस्थानी हा पक्ष प्रवेश झाला. (Shilpa Bodkhe join Shiv Sena)

शिल्पा बोडखे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत राजीनामा देताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना खरमरीत पत्र लिहिलं होतं. या पत्राच्या माध्यमातून त्यांनी ठाकरे गटाच्या काही महिला पदाधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिल्पा बोडखे यांचे पक्षात स्वागत केले. तसेच बोडखे यांनी यापुढेही प्रामाणिकपणे पक्षाचे काम करावे आणि पक्षाचे विचार विदर्भातील सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवावेत, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. या वेळी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे उपस्थित होत्या.

ठाकरे गटाचा राजीनामा देताना काय म्हटलं होतं ?

"माझा शिवसेना (ठाकरे गट) पक्षाला शेवटचा जय महाराष्ट्र...माझी चार वर्षांची मेहनत आज व्यर्थ गेली, याचे दु:ख आहे. पक्षात पक्षप्रमुख व शिवसेना नेते @AUThackeray जी यांच्या शद्बाला काही किंमत न देता विशाखा राऊत व रंजना नेवाळकर आपला मनमानी कारभार करत आहेत. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा देत आहे. मनीषा कायंदे व मीना कांबळी यांनी बघितलेले स्वप्न विशाखा राऊत व रंजना नेवाळकर यांनी यशस्वी करून दाखवल्याबद्दल दोघींचे अभिनंदन. पुढेदेखील शिवसेना भवनात बसून असेच कार्य करत राहा. आशा करते रंजना नेवाळकर यांच्या हाताचा मटणाचा वास गेला असेलच पुन्हा नागपुरात येऊन सावजीवर ताव मारा व महाप्रसादाचे वाटप करा," असं शिल्पा बोडखे यांनी एक्सवर (ट्विटर) म्हटलं होतं.

(Edited By-Ganesh Thombare)

R

CM Shinde
Kolhapur Politics : क्षीरसागरांची घोषणा आणि आमदार जयश्री जाधवांकडून 'ते' पत्र व्हायरल!

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com