Kolhapur Politics : क्षीरसागरांची घोषणा आणि आमदार जयश्री जाधवांकडून 'ते' पत्र व्हायरल!

Jayashree Jadhav's Letter : कोल्हापूरला महाराष्ट्राची फुटबॉल पंढरी म्हणून ओळखले जाते. यातून अनेक खेळाडू निर्माण होण्याच्या दृष्टीने विविध संकल्पना राज्य सरकारकडून राबविण्यात येणार आहेत.
Jayashree Jadhav's Letter
Jayashree Jadhav's LetterSarkaranama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात विकासकामांवरून श्रेयवादाची लढाई अद्यापही सुरूच आहे. माजी आमदार तथा राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि आमदार जयश्री जाधव यांच्या सिद्धार्थनगर पूरसंरक्षित भिंतीवरून सुरू असलेली श्रेयवादाची लढाई चालू असताना आता फुटबॉल स्ट्रीटवरून पुन्हा एकदा जुंपली आहे. माजी आमदार क्षीरसागर यांनी रविवारी (ता. २५ फेब्रुवारी) सायंकाळी याच्या उद्घाटनाची पोस्ट व्हायरल केल्यानंतर आमदार जयश्री जाधव यांच्याकडूनही एक पत्रक व्हायरल करण्यात आले आहे. (Kolhapur Football News)

कोल्हापूरला महाराष्ट्राची फुटबॉल पंढरी म्हणून ओळखले जाते. यातून अनेक खेळाडू निर्माण होण्याच्या दृष्टीने आणि नवनिर्मित फुटबॉल खेळाडू घडविण्यासाठी विविध संकल्पना राज्य सरकारकडून राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी 50 लाखांचा निधी राज्य सरकारकडून देण्यात आला आहे. राजर्षी शाहू महाराज स्टेडियमजवळील रावणेश्वर मंदिर ते टेंबे रोड इथेपर्यंत फुटबॉल स्ट्रीट साकारले जाणार आहे. (Rajesh Kshirsagar Vs Jayashree Jadhav)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Jayashree Jadhav's Letter
Loksabha Election 2024 : भाजपकडून आणखी एक माजी आयपीएस अधिकारी लोकसभेच्या रिंगणात; मतदारसंघही ठरला

या फुटबॉल स्ट्रीटअंतर्गत दिलबहार तालीम ते शाहू स्टेडियम प्रवेशद्वारापर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता करण्यात येणार आहे. ॲम्पी थिएटर, पाथ वे, लँडस्केपिंग, चार स्टील कमानी, ठिकठिकाणी बैठक व्यवस्था, फुटबॉल टीमवर कट आउट, तसेच कोल्हापुरातील फुटबॉल टीमचे झेंडे असे आकर्षक फुटबॉल स्ट्रीट होण्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्यात आला होता. त्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर आज (ता. 26 फेब्रुवारी) सायंकाळी त्याचे उद्‌घाटन करणार आहेत.

दरम्यान, क्षीरसागर यांचे उद्घाटनाचे पत्रक व्हायरल झाल्यानंतर आमदार जयश्री जाधव यांनीही एक पत्रक व्हायरल केले आहे. आमदार जयश्री जाधव यांच्याकडून फुटबॉल खेळायला चालना मिळावी, यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा केल्याचा दाखला या पत्रातून देण्यात आला आहे. नागरी योजनेंतर्गत हा निधी मिळविण्यासाठी 2022-23 मध्ये आमदार जाधव यांनी पत्रव्यवहार केल्याचे दाखले देण्यात आले आहेत.

Edited By : Vijay Dudhale

R

Jayashree Jadhav's Letter
Shirur Loksabha Constituency : शिरूर लोकसभेसाठी अजितदादांचा मोठा डाव; बडा नेता लवकरच करणार घरवापसी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com