Thackeray VS Shinde : बुलढाण्यात रंगणार शिवसेना विरुद्ध शिवसेना सामना !

Shivsena : दोन्ही पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू.
Uddhav Thackeray and Eknath Shinde
Uddhav Thackeray and Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thackeray VS Shinde : लोकसभा निवडणूक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. सर्वत्र निवडणूकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. मतदारसंघात कोणत्या लढती राहतील, याचे अंदाज बांधणे सुरू झाले आहे. पश्चिम विदर्भातील महत्वाचा मतदारसंघ समजला जाणाऱ्या बुलढाण्यात लोकसभा निवडणुकीची लढत अतिशय चुरशीची राहणार असल्याचं बोललं जातं आहे.

शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगणार असण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत चांगली रंगत येणार आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. एकनाथ शिंदेंनी भाजप सोबत हातमिळवणी करीत सत्ता स्थापन केली. दरम्यान सत्तासंघर्षाच्या निकालानंतर एकीकडे शिवसेनेची 'मशाल' पेटली तर दुसरीकडे 'धनुष्यबाण' राहिले.

Uddhav Thackeray and Eknath Shinde
Akola Politics : अजितदादांच्या राष्ट्रवादीत उफाळून आला पुन्हा गटबाजीचा वाद!

या दोन पक्षातील एकमेकांच्या विरोधात प्रचंड कटुता आणि कट्टरता आहे. हीच कट्टरता आता आगामी निवडणुकीतही पाहायला मिळणार आहे. दोन्ही शिवसेनेचे उमेदवार जेव्हा आगामी लोकसभा निवडणुकीत एकमेकांशी भिडतील, त्यावेळी या लढतीकडे खासकरून सर्वांचे लक्ष असेल. अशीच एक लढत ही बुलढाणा या लोकसभा मतदारसंघात होण्याची शक्यता आहे.

बुलढाणा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. उद्धव ठाकरे यांची साथ सोडून विद्यमान खासदार प्रतापराव जाधव यांनी एकनाथ शिंदेंची कास धरली. त्यामुळे उद्धव ठाकरे शिवसेनेत जाधवांबद्दल कटुता निर्माण झाली आहे. काही महिन्यांपूर्वी उध्दव ठाकरे यांनी आढावा बैठक घेऊन बुलढाण्यात शिंदे यांच्यासोबत गेलेल्या प्रतापराव जाधव यांचा पराभव करा आणि या मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून आणा असे म्हणत कामाला लागण्याचे आदेश शिवसैनिकांना दिले होते.

दुसरीकडे या मतदारसंघात नुकतेच झालेल्या शिवसंकल्प यात्रे सभेदरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही बुलढाणा लोकसभेवरून बोलताना, प्रतापराव जाधवांच्या विरोधातील उमेदवाराचे डिपॉझीट जप्त होईल, असे म्हणत समोरच्या उमेदवाराला आवाहन दिले. दोघांच्या आवाहनांनंतर दोन्ही कडचे शिवसैनिक कामाला लागले आहेत. त्यामुळे दोन्ही शिवसेना या मतदारसंघावर विशेष लक्ष ठेऊन आहेत. या मतदारसंघातील लढत ही दोघांसाठी प्रतिष्ठेचा विषय असणार आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेपैकी कोण प्रतिष्ठा राखेल, हे पाहणे औसुक्याचे ठरणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तर काही दिवसांपूर्वी बुलढाणा हा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. आम्ही महाविकास आघाडी जरी असलो,तरी बुलढाणा लोकसभेच्या जागेवर अधिकार आमचाच असल्याचे अंबादास दानवे म्हणाले होते. त्यामुळे शिवसेना ठाकरे गटांकडून हा मतदारसंघ ताब्यात घेण्यासाठी रणनीती आखली जात आहे. तर या मतदारसंघात ठाकरे गटाकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांच्या नावाची चर्चा आहे. खेडेकर यांनी या मतदारसंघासाठी तयारीही सुरू केल्याचे बोलले जात आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातील लढत अतिशय काट्याची होणार आहे. शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना झाल्यास या मतदारसंघात नेमकी कोणती शिवसेना बाजी मारते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे.

Edited By : Atul Mehere

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com