Sunil Kedar : माजी मंत्री सुनील केदारांना ‘सर्वोच्च' झटका

Congress MLA Sunil Kedar : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यात न्यायालयाने दोषी ठरवलेले माजी मंत्री व सावनेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांना सर्वोच्च न्यायालयाने मोठा झटका दिला आहे.
Sunil Kedar
Sunil Kedar Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 26 July : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या घोटाळ्यात न्यायालयाने दोषी ठरवलेले माजी मंत्री व सावनेर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे आमदार सुनील केदार (Sunil Kedar) यांना सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) मोठा झटका दिला आहे. त्यामुळे आता त्यांना पुढील सहा वर्षे कोणतीही निवडणूक लढवता येणार नाही.

नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील दीडशे कोटींच्या घोटाळा प्रकरणी न्यायालयाने केदार यांना दोषी ठरवलं आहे. त्यामुळे त्यांची आमदारकी गेली आहे. त्याचबरोबर आता त्यांना पुढील सहा वर्षे निवडणूक देखील लढवता येणार नाही.

कनिष्ठ न्यायालयाने केदारांना दोषी ठरवले होते. त्यानंतर केदारांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) नागपूर खंडपीठात धाव घेतली होती. आपल्याला ठोठावलेल्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी त्यांनी केली होती. केदारांच्या वकिलांनी न्यायालयात जोरदार युक्तीवाद केला होता.

राहूल गांधी यांच्याप्रमाणे आपल्यालाही न्याय देण्याची मागणी त्यांनी केली होती. केदारांचे (Sunil Kedar) म्हणणे खोडून काढण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने खास दिल्लीतील एका विशेष वकिलाची नियुक्ती केली होती. केदारांनी केलेला गुन्हा गंभीर आहे. लोकप्रतिनिधींच्या शिक्षेला स्थगिती देणे असा काही नियम नाही. घोटाळेबाज लोकप्रतिनिधींना मोकळे सोडल्यास समाजात चुकीचा संदेश जाईल. ते सर्वांसाठी घातक ठरेल असे सांगून शिक्षेला स्थगिती देण्यास जोरदार विरोध केला होता.

Sunil Kedar
Uddhav Thackeray: विदर्भात 'आयाराम-गयाराम' सुरू; ठाकरेंचा सहसंपर्क प्रमुख शिंदेंच्या शिवसेनेत

दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर केदारांच्या शिक्षेला स्थगिती देण्यास आणि दोषमुक्त करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला होता. त्यानंतर केदारांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा त्यांच्या दोषीसिद्धिला स्थगिती देण्यास नकार दिला. तसंच सत्र न्यायालयाच्या शिक्षेला आव्हान देणारा प्रलंबित अर्ज सप्टेंबर महिन्यापर्यंत निकाली काढण्याचे आदेशही दिले.

सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) निकालाने आमदार केदार आणि त्यांचे समर्थकांनी मोठा झटका बसला आहे. शिवाय न्यायालयाच्या या निकालामुळे केदार यांना पुढील विधानसभेची निवडणूकसुद्धा लढवता येणार नाही. केदार यांचे नागपूर जिल्ह्यात चांगलाच दबदबा आहे. काँग्रेससह इतर पक्षातील नेतेही त्यांना वचकून असतात.

Sunil Kedar
BJP Leader Join Shivsena : भाजपने मला बेवकूफ बनवलं...; ठाकरे गटात प्रवेश करताच माजी आमदाराचा मोठा खुलासा

लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार निवडून आणूण त्यांनी आपले राजकीय वजन भाजपला दाखवून दिले. त्यानंतर त्यांनी भाजपच्या आमदारांना आव्हान देणे सुरू केले होते. भाजपचे हिंगणा मतदारसंघातील आमदार समीर मेघे यांना त्यांच्याच मतदारसंघात जाऊन पराभूत करण्याचा इशारा देखील केदार यांनी दिला होता. यासाठी त्यांनी स्वतः लढण्याची तयारी दाखवली होती. मात्र, आता कोर्टाच्या निर्णयामुळे ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com