BJP Leader Join Shivsena : भाजपने मला बेवकूफ बनवलं...; ठाकरे गटात प्रवेश करताच माजी आमदाराचा मोठा खुलासा

BJP Leader Ramesh Kuthe joins Uddhav Thackerays Shivsena : "भाजपने मला बेवकूफ बनवलं. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे नागपूरला आले होते. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की, आपल्याकडे येणाऱ्यांची खूप मोठी रांग आहे. 100 जण आपल्याकडे येतील आणि 5 जण जातील."
Ramesh Kuthe Joins Uddhav Thackerays Shiv Sena
Ramesh Kuthe Joins Uddhav Thackerays Shiv SenaSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News, 26 July : गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे (Ramesh Kuthe) यांनी आज शुक्रवाी (ता. 26 जुलै) रोजी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला. शिवसेनेत येताच त्यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपने मला 2018 पासून बेवकूफ बनवलं अशा शब्दात त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे आता शिवसेना ठाकरे गटाचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. लोकसभेनंतर ठाकरे गटाने विधानसभेची जोरदार तयारी सुरु केली आहे. विदर्भात देखील ठाकरे गटाच्या वतीने जोरदार मोर्चेबांधणी सुरु आहे.

नुकतंच ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी विदर्भात जाऊन विविध मतदारसंघांची पाहणी केली होती. त्यानंतर, त्यांनी विदर्भात शिवसेना पक्ष सर्वात मोठा होऊ शकतो, विदर्भात (Vidarbha) शिवसेनेला खूप वाव असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. अशातच आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत गोंदियाचे माजी आमदार आणि भाजपचे नेते रमेश कुथे यांनी शिवसेना ठाकरे गटात पक्षप्रवेश केला.

कुथे यांच्या पक्ष प्रवेशामुळे शिवसेनेची (Shivsena) ताकद विदर्भात वाढली आहे. आमदार कुथे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनीही ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. तर ठाकरे गटात प्रवेश करताच, रमेश कुथे यानी भाजपवर निशाणा साधला, भाजपने मला 2018 पासून बेवकूफ बनवल्याचं ते म्हणाले. तसंच मी पक्षातच होतो, फक्त शिकण्यासाठी तिकडे गेलो होतो, असंही त्यांनी म्हटलं.

Ramesh Kuthe Joins Uddhav Thackerays Shiv Sena
Assembly Election 2024 : लोकसभेतील पराभवानंतर विधानसभेची भीती, भाजपचे मंथन अन् चिंतन

पक्ष प्रवेशानंतर माध्यमांशी बोलत रमेश कुथे म्हणाले, "भाजपने मला बेवकूफ बनवलं, फेब्रुवारी 2024 मध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) नागपूरला आले होते. तेव्हा त्यांनी आम्हाला सांगितलं की, आपल्याकडे येणाऱ्यांची खूप मोठी रांग आहे. 100 जण आपल्याकडे येतील आणि 5 जण जातील, त्यामुळे आपल्याला फरक पडत नाही. त्याच दिवशी समजलं की भाजपने आपल्याला बेवकूफ बनवलं."

शिवसेनेत घरवापसी

यावेळी कुथे यांनी 2019 ला मी विधानसभेचे तिकीट मागितलं होतं, पण भाजपने मला तिकीट दिलं नसल्याचंही सांगितलं. ते म्हणाले, "मी आधी शिवसेनेत होतो आणि आता पुन्हा एकदा शिवसेनेत आलो. 2019 ला भाजपने पण विधानसभेचं मला तिकीट दिलं नाही. तसंच जिल्हा परिषदेच्या सभापतीसाठी माझ्या मुलाचं नाव सुचवलं ते देखील त्यांनी नाकारलं.

Ramesh Kuthe Joins Uddhav Thackerays Shiv Sena
Anil Deshmukh : अनिल देशमुखांना परत तुरुंगात जावे लागणार; परिणय फुकेंनीही फुंकले रणशिंग

माझा मुलगा अपक्ष म्हणून उभा राहिला आणि सभापती झाला. आताही ते मला तिकीट देणार नव्हते, त्यामुळे भाजपमध्ये राहून उपयोग नव्हता. आता विधानसभेचं तिकीट आम्ही मागितलं असून ते 100% मला मिळणार, असा विश्वास कुथे यांनी व्यक्त केला. मात्र, कुथे यांनी त्यांचा मुलगा अपक्षच राहणार असल्याचं सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com