Shivsena Vs BJP: लोकसभेचे उमेदवार बदलण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव, 'तो' सर्व्हे खरा की खोटा...; शिवसेना नेत्याच्या दाव्यानं खळबळ

Shindes Shivsena Leader On Mahayuti Lok Sabha Seat Sharing: "मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उमेदवार बदलण्यासाठी दबाव होता. विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती."
Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra FadnavisSarkarnama

Krupal Tumane On Mahayuti Lok Sabha Seat Sharing: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर उमेदवार बदलण्यासाठी दबाव होता. विद्यमान खासदारांचे तिकीट कापण्याची त्यांची मुळीच इच्छा नव्हती. विदर्भात शिंदे सेनेच्या उमेदवारांच्या पराभवाचे हे मुख्य कारण ठरल्याचा गौप्यस्फोट माजी खासदार कृपाल तुमाने यांनी केला आहे.

तुमाने यांनी रामेटकचा गड दोनदा शिवसेनेला जिंकून दिला होता. शिंदे यांच्यासोबत बाहेर पडलेल्या खासदारांमध्ये तुमाने यांचाही समावेश होता. 12 खासदारांना घेऊन ते उद्धव ठाकरे यांना सोडून शिंदेंच्या शिवसेनेत सहभागी झाले होते. मात्र, याची मोठी किंमत त्यांना चुकवावी लागली. कारण ठाकरेंना सोडून शिंदे गटात सामील झालेल्या खासदारांपैकी चार ते पाच जणांना खासदारकी गमवावी लागली.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तुमाने यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. मी असो की भावना गवळी सातत्याने निवडूण येत होतो. कोणाच्या सांगण्यावरून उमेदवार बदलले हे ठाऊक नाही. कुठल्या कंपनीने सर्व्हे केला, कसा केला हे सर्व गुलदस्तात आहे. सर्व्हे खरा होता की खोटा हेसुद्धा कळायला काही मार्ग नाही. मात्र शिंदे सेनेचे यामुळे मोठे नुकसान झालं.

हेमंत पाटील हिंगोलीचे खासदार होते. त्यांच्या पत्नीला मराठवाड्यातून विदर्भात आणण्याचे कारण समजले नाही. नाशिकमध्ये (Nashik) हेमंत गोडसे यांना शेवटपर्यंत झुलवत ठेवलं होतं. अमरावतीमध्ये आनंदराव अडसूळ दमदार उमेदवार होते. त्यांनाही थांबवण्यात आले. याचा काहीच फायदा महायुतीला झाला नाही. सर्वच पराभूत झाले. अदलाबदली केली नसती तर महायुतीच्या चार जागा वाढल्या असत्या, असं म्हणत तुमाने यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली.

Eknath Shinde, Devendra Fadnavis
Hemant Godse News: कार्यकर्ते नसलेल्या दलबदलूंच्या फौजेने केला हेमंत गोडसे यांचा घात!

लोकसभेतील जागावाटप आणि पराभवाबाबत आत्मचिंतन करण्याची गरज आहे. पक्षश्रेष्ठींना निर्णय घ्यावा लागेल. त्यांनाही याची खंत आहे. आमचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. आम्ही आता विधानसभेसाठी जोमात तयारी करू आणि राज्यात एकनाथ शिंदे यांचे सराकर पुन्हा आणू असा विश्वास तुमाने यांनी नागपुरात पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com