Amol Mitkari Criticised BJP : 'हा' कार्यक्रम म्हणजे भाजपचा प्रचार मेळावा, मिटकरींचा सरकारला घरचा आहेर

Vidarbha Politics : अकोल्यात आज आरोग्य विभागाच्या विविध रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रम आणि दोन दिवसीय आरोग्य महामेळावा होत आहे.
Amol Mitkari Criticized BJP :
Amol Mitkari Criticized BJP :Sarkarnama
Published on: 
Updated on: 

Amol Mitkari Criticised BJP : अकोल्यात विविध कार्यक्रमांसाठी येत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या स्वागतासाठी मोठमोठे बॅनर्स लावण्यात आले आहेत. पण या 'बॅनर' वरूनच आता भाजप आणि अजित पवार यांच्या गटात वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे.

याचं कारण म्हणजे, या 'बॅनर'वर अजित पवार गटाच्या आमदार पदाधिकाऱ्यांचा फोटो नसल्याने आमदार अमोल मिटकरी यांनी हा भाजपचा प्रचाराचा कार्यक्रम आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. तसेच, बॅनरवर केवळ भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांचेच फोटो लावण्यात आले आहेत. त्यामुळे ही जाहिरात सरकारी खर्चातून करण्यात आली असेल तर याची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी मिटकरींनी केली.

Amol Mitkari Criticized BJP :
Ajit Pawar News : अजितदादांनी भाजपश्रेष्ठींसमोर जाणं पुन्हा टाळलं; जीएसटी काउन्सिलसाठी केसरकर दिल्लीला रवाना

अकोल्यात आज आरोग्य विभागाच्या विविध रुग्णालयाच्या लोकार्पण कार्यक्रम आणि दोन दिवसीय आरोग्य महामेळावा होत आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील करणार आहे. मात्र, याच आरोग्य महामेळाव्यावरून राज्यातील सत्ताधारी महायुतीतच मतभेद उफाळून आले आहेत.

हा कार्यक्रम म्हणजे भाजपचा प्रचार कार्यक्रम असल्याची टीका राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आमदार अमोल मिटकरींनी केली आहे. त्यामुळे मिटकरी यांनी सरकारला घरचा आहेर दिला आहे. आरोग्य विभागाच्या कार्यकर्मासाठी अकोला शहर आणि जिल्हाभरात पोस्टर आणि बॅनर्स लागले. यावर कोणत्याही वैधानिक पदावर नसलेल्या भाजप नेत्यांचे आणि पदाधिकाऱ्यांचे फोटो लागले आहे. दरम्यान, सत्ताधारी अजित पवार गटासोबतच विरोधी शिवसेना ठाकरे गटानेही या प्रकाराला विरोध केला आहे.

Amol Mitkari Criticized BJP :
Hasan Mushrif Money laundering case : मनी लाँड्रिंगप्रकरणी मुश्रीफांच्या अडचणी पुन्हा वाढणार ?

काय म्हणाले आमदार अमोल मिटकरी

जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सत्तेमध्ये सहभागी असेल तर जिल्ह्यातील भाजप नेत्यांना याचे ज्ञान नाही का? कारण 'या' बॅनर वर महाराष्ट्र शासनाची राजमुद्रा आहे. माजी महापौर यांच्या फोटोसह अन्य सदस्यांचे फोटो लावत असाल आणि भाजपचे बॅनर असेल तर आमचे म्हणणे नाही परंतु सरकारी खर्चातून ही होर्डिंग्जबाजी आहे का, याचं पालकमंत्र्यांनी अवलोकन करावं. आम्ही जर सत्तेतील घटक पक्ष आहोत, तर राष्ट्रवादीच्या आमदाराचा फोटो या होर्डिंग्जवर का नाही, असा प्रश्न मिटकरींनी विचारला आहे. तसेच, यासंदर्भात मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री विखे पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. तर यामध्ये शासकीय कर्मचारी दोषी असतील तर त्यांच्यावरही कारवाई करण्याची मागणी मिटकरी यांनी केली आहे.

आमदार नितीन देशमुखांचा कार्यक्रमावर बहिष्कार

भाजपने स्वत:च्या प्रचारासाठी सरकारी पैशाची उधळपट्टी केल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांनी केला. हा कार्यक्रम म्हणजे भाजपची प्रचारसभाच असल्याने कार्यक्रमाला आपण जाणार नसल्याचं आमदार नितीन देशमुखांनी स्पष्ट केले आहे.

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना केलं स्थानबद्ध-

शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना आज उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आगमन होताच पोलिसांकडून ठाकरे गटाचे 50 कार्यकर्ते स्थानबद्ध केले. शहरप्रमुख राजेश मिश्रांचा देखील यात समावेश आहे. तर जुने शहर पोलीस स्टेशनमध्ये आमदार नितीन देशमुख हे हजर झाले होते.

Edited By- Anuradha Dhawae

Amol Mitkari Criticized BJP :
Pune Politics : अजितदादा पालकमंत्री झाले, तरीही चंद्रकांतदादा म्हणतात, "कायद्यान्वये सहपालकमंत्री मीच..."

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.