Bhandara Election Results: आमदारकीची हॅटट्रिक केलेल्या आमदार भोंडेकरांना मोठा धक्का; पत्नीचा पराभव,भाजप नेत्यांसोबतचा पंगा महागात

Narendra Bhondekar News: भाजप व राष्ट्रवादीचे बडे नेते भोंडेकर यांच्या प्रचारात फिरकले नाही. मात्र शिंदे येऊन गेले. निवडणुकीच्या निकालानंतर भोंडेकर आणि भाजपच्या नेत्यांमध्ये आणखीच संघर्ष वाढला. दोन्ही पक्षाच्यावतीने आजही आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. नगर पालिका महायुतीने वेगवेगळी लढल्याने भोंडेकर यांना फटका बसला आहे.
MLA Narendra Bhondekar, Parinay Phuke
MLA Narendra Bhondekar, Parinay PhukeSarkarnama
Published on
Updated on

Bhandara News: भंडारा विधानसभा मतदारसंघात विजयाची हॅटट्रिक केलेले आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मात्र नगरपालिकेच्या निवडणुकीत पत्नीला निवडून आणता आले नाही. भाजपच्या मधुरा मतनकर यांनी भोंडेकरांच्या पत्नी अश्‍विनी भोंडेकर यांचा पराभव केला. काँग्रेसच्या जयश्री बोरकर यांनासुद्धा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे शिवसेनेचे चांगलीच अस्वस्थता निर्माण झाली आहे. सर्व पदे आपल्याच घरात ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या नेत्यांना भंडाऱ्यातील मतदारांनी धडा शिकवला असल्याचे दिसून येते.

भंडारा नगरपरिषदेत भाजपचे 23, काँग्रेसचे 4, शिवसेना (शिंदे) 4 आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तीन सदस्या निवडून आले आहेत. येथे आमदार शिवसेनेचा असला तर नगर परिषदेवर मात्र भाजपने झेंडा फडकावला आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुती एकत्र लढली होती. एकनाथ शिंदे शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांना उमेदवार देण्यास भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला होता. मात्र, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भोंडेकर हेच उमेदवार असतील अशी ठाम भूमिका घेतली होती.

भाजप व राष्ट्रवादीचे बडे नेते भोंडेकर यांच्या प्रचारात फिरकले नाही. मात्र शिंदे येऊन गेले. निवडणुकीच्या निकालानंतर भोंडेकर आणि भाजपच्या (BJP) नेत्यांमध्ये आणखीच संघर्ष वाढला. दोन्ही पक्षाच्यावतीने आजही आरोप-प्रत्यारोप सुरूच असतात. नगर पालिका महायुतीने वेगवेगळी लढल्याने भोंडेकर यांना फटका बसला आहे.

भंडारा जिल्ह्यातील तुमसर नगर परिषदेत नगराध्यक्षपदाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे बंडखोर उमेदवार सागर गभणे निवडून आले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे त्यांच्यासोबत होते. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दिलेला उमेदवार अभिषेक कारेमोरे मात्र पराभूत झाले आहेत.

MLA Narendra Bhondekar, Parinay Phuke
Shirur Election Results: शिरुरच्या नगराध्यक्षपदावर राष्ट्रवादीचा झेंडा,आमदार कटकेंची 'कॉलर' झाली टाईट; अशोक पवारांच्या पॅनेलचा धुव्वा

भाजप 10, अजितदादांचे 10, काँग्रेस 3, शिवसेना (शिंदे) 1 आणि अपक्ष 1 येथून निवडून आले आहेत. पवनी नगरपालिकेत तिकीट नाकारल्याने भाजपच्या विजया नांदुरकर राष्ट्रवादीत दाखल झाल्या होत्या. त्या निवडूनसुद्धा आल्या आहेत. तिकीट वाटपात मनमर्जी करणाऱ्या नेत्यांना त्यांनी धडा शिकवला. पवनी येथे भाजपला 13, शिवसेना (शिंदे)4, राकाँ (अजित पवार) 2 आणि अपक्ष 1 सदस्य विजयी झाले आहेत.

काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार देवश्री कापगते विजयी झाल्या आहेत. या नगर परिषदेत शिवसेना 1, काँग्रेस 7, भाजप 8, राष्ट्रवादीचा 1 उमेदवार निवडून आला आहे. तीन अपक्ष उमेदवारही येथून निवडून आले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com