Ravikant Tupkar News : शेतकरी नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra Singh Tomar) यांची भेट घेऊन सोयाबीन आणि कापूस प्रश्नांबाबत चर्चा केली. त्याच बरोबर तुपकरांनी माजी कृषीमंत्री शरद पवार यांचीही भेट घेऊन शेतकऱ्यांच्या मागण्या मांडल्या.
केंद्रीय कृषीमंत्री या नात्याने सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांची बाजू आणि त्यांच्या हिताच्या मागण्या पंतप्रधानांकडे मांडाव्यात, अशी विनंतीही त्यांनी कृषीमंत्री तोमर यांना केली. तर पोल्ट्री लॉबी केंद्रीय पशुसंवर्धन मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांना घेऊन सोयाबीन-कापसाचे दर कमी होण्याबाबत दबाव आणत असल्याचं देखील यावेळी ते म्हणाले.
यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि वाणिज्य मंत्री पीयुष गोयल (Piyush Goyal) यांना शेतकऱ्यांचे प्रश्न आणि मागण्यांबाबत पत्र देतो, शिवाय स्वत: भेट घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडतो, असं अश्वासन तोमर यांनी तुपकरांना दिलं. त्यानंतर तुपकरांनी माजी कृषीमंत्री शरद पवार (Sharad Pawar) यांचीही भेट घेऊन सोयाबीन आणि कापूस उत्पादकांचे प्रश्न त्यांच्याकडे मांडले.
शेतकऱ्यांच्या हिताच्या या सर्व मागण्या रास्त आहेत. त्यामुळे केंद्रीय वाणिज्य मंत्री, केंद्रीय कृषीमंत्र्यांना प्रत्यक्ष भेटून या मागण्यांबाबत त्यांच्याकडे पाठपुरावा करतो, अशी हमी शरद पवारांनी त्यांना यावेळी दिली. तसेच शेतकऱ्यांचे प्रश्न दिल्ली दरबारी मांडल्याने पवारांनी तुपकरांचे कौतुकही केले.
दरम्यान, केंद्रीय वाणिज्य मंत्री आणि आजी-माजी केंद्रीय कृषी मंत्री यांची भेट घेऊन सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांबाबत केलेल्या पाठपुराव्यानंतर तरी शेतकऱ्यांसाठी सरकार उपयुक्त भूमीका घेणार का? हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.