Uddhav Thackeray, Sanjay Rathod and Aditya Thackeray
Uddhav Thackeray, Sanjay Rathod and Aditya ThackeraySarkarnama

उद्धव ठाकरे यांनी आदित्य यांना पाठवण्याचे आश्‍वासन दिले होते, पण...

तिन्ही जिल्हा प्रमुखांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत शिवसेनेतच राहण्याचा निर्णय जाहीर केला.

यवतमाळ : ’आम्ही आजही शिवसेनेतच आहोत, आमच्यासाठी भविष्यात जेव्हा कधी ’मातोश्री’चे दार उघडले जाईल तेव्हा आम्ही जाऊ.’ असे स्पष्ट वक्तव्य एकनाथ शिंदे यांच्या बंडात सहभागी असलेले शिवसेनेचे दिग्रसचे आमदार संजय राठोड (MLA Sanjay Rathod) यांनी आज केले. ’आम्ही बंड नव्हेतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात उठाव केला,’ असेही आमदार राठोड यावेळी म्हणाले.

शिवसेनेचे (Shivsena) नेते व राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या 39 आमदारांसह 15 अपक्ष आमदारांना सोबत घेऊन राज्यातील महाविकास आघाडीची सत्ता उलथवून टाकली. भाजपसोबत (BJP) सत्ता स्थापन करीत स्वत: ते मुख्यमंत्री झाले. शिवसेनेतील या बंडामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या बंडामुळे शिवसैनिकांमध्ये प्रचंड नाराजी दिसून आली. जिल्ह्यातही त्याचे पडसाड उमटले. तिन्ही जिल्हा प्रमुखांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवत शिवसेनेतच राहण्याचा निर्णय जाहीर केला.

बंडात सहभागी आमदार संजय राठोड बुधवारी यवतमाळात दाखल झाले. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, समेट घडविण्यासाठी मी, गुलाबराव पाटील व दादा भुसे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी आदित्य ठाकरे यांना पाठविण्याचे आश्‍वासन दिले होते. ते समेटासाठी तयारही होते. परंतु, शिवसेना प्रवक्ते संजय राऊत एकनाथ शिंदेबाबत जणूकाही कट्टर दुष्मणी असल्याप्रमाणे बोलले. त्यामुळे शिवसेना फुटली.

खरे सांगायचे म्हणजे खासदार संजय राऊत यांनीच शिवसेना फोडली, असा पुनरुच्चारही आमदार संजय राठोड यांनी यावेळी केला. त्यानंतर संजय राठोड यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यावेळी आमदार राठोड यांचा वाढदिवसही केक कापून साजरा करण्यात आला. याप्रसंगी दारव्हा, दिग्रस व नेर तालुक्यातील आमदार राठोड यांचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Uddhav Thackeray, Sanjay Rathod and Aditya Thackeray
संजय राठोड यांच्या यवतमाळातील कार्यालयाला सुरक्षा…

शिवसेना फोडण्याचे पातक राष्ट्रवादीचेच..

महाराष्ट्रातच्या इतिहासात शिवसेना जेव्हा जेव्हा फोडली ती राष्ट्रवादी काँग्रेसनेच फोडली आहे. फरक एवढाच आहे की आतापर्यंत बाहेर राहून फोडली, आता सोबत राहून फोडली. यावेळी खासदार संजय राऊत यांच्या मदतीने शिवसेना फोडल्याचा आरोप आमदार संजय राठोड यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com