अमरावती : शहरातील उमेश कोल्हे हत्या प्रकरणात सातवा संशयीत आरोपी शेख इरफान शेख रहीम याला अमरावती पोलिसांनी आज सायंकाळी नागपुरातून आटक केली. संशयीत हा अमरावती शहरातील कमेला ग्राउंड येथील रहिवासी आहे.
येथील मेडिकल व्यावसायिक उमेश शंकरराव कोल्हे यांनी नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावरून पोस्ट शेअर केल्याने त्यांची हत्या करण्यात आल्याची बाब आता स्पष्ट झाली आहे. पोलिस (Police) उपायुक्त (DCP) विक्रम साळी यांनी याला आज दुपारी दुजोरा दिला. राजस्थानच्या (rajasthan) उदयपूर (Udaypur) शहरात झालेल्या हत्येची अमरावतीत पुनरावृत्ती झाल्याचे त्यावरून दिसून येते. ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी अमरावती पोलिसांना तब्बल अकरा दिवसांचा कालावधी लागला. एनआयएच्या चमूने अमरावतीत (Amravati) दाखल होऊन दोन दिवस प्राथमिक चौकशी केली. त्यानंतरच अमरावती पोलिसांनी यासंदर्भात अधिकृत भाष्य केले.
https://twitter.com/SarkarnamaNews/status/1543259973446402048
या प्रकरणात आतापर्यंत अमरावतीच्या शहर कोतवाली पोलिसांनी सहा संशयितांना अटक केली होती. त्यामध्ये मुद्दसीर अहमद ऊर्फ सोनू रजा वल्द शेख इब्राहीम (वय २२, रा. बिस्मिल्लानगर, अमरावती), शाहरूख पठाण बादशहा हिदायत खान (वय २५, रा. सुफियानगर), अब्दुल तौफिक ऊर्फ नानू शेख तसलीम (वय २४, रा. लालखडी), शोएब खान ऊर्फ भुऱ्या वल्द साबिर खान (वय २२, रा. यास्मीननगर), असे चौघे २३ जून रोजी अटक झाले होते. त्यानंतर अतीब रशीद वल्द आदिल रशीद (वय २२, रा. मौलाना आझादनगर), डॉ. युसूफ खान बहाद्दूर खान (वय ४४, रा. बिलाल कॉलनी, अमरावती) यांचा समावेश असल्याचे पोलिस उपायुक्त विक्रम साळी यांनी आज दुपारी माध्यमांना सांगितले होते. त्यानंतर सायंकाळी शेख इरफान शेख रहीम याला नागपुरातून ताब्यात घेण्यात आले.
२१ जून २०२२ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास उमेश कोल्हे (वय ५५) हे दुकान बंद करून घराकडे जात असताना शहरातील न्यू हायस्कूल मेन शाळेसमोरील गल्लीत दोघांनी गळ्यावर व शरीरावर वार करून त्यांची हत्या केली. नऊ दिवसांपर्यंत पोलिस हत्येचे कारण शोधूच शकले नाही. त्यानंतर दोन दिवसांपूर्वीच एनआयएची टीम अमरावतीत दाखल झाली. त्यांनी २४ तासांनंतर बऱ्याच गोष्टींचा उलगडा केल्यानंतर स्थानिक पोलिस ठोस निष्कर्षापर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. त्यामुळे स्थानिक पोलिस एनआयएच्या टीमची वाट बघत होते का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
उमेश कोल्हे यांनी हत्येच्या काही दिवसांपूर्वी नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट इतरांसोबत व्हॉट्सअॅपवरून शेअर केली होती. ती पोस्ट हटविण्यासंदर्भात त्यांच्या काही मित्रांनी कोल्हे यांना सांगितले होते. त्यानंतर त्यांनी ही पोस्ट हटविली होती. ज्या भागात कोल्हे यांचे प्रतिष्ठान आहे, त्या भागातील काही लोकांची त्यांनी माफीही मागितली होती. परंतु, ही बाब पोलिसांच्या रेकॉर्डवर आलेली नाही.
दोन्ही घटनांमध्ये बरेच साम्य
राजस्थानच्या उदयपूर येथे एका व्यक्तीची ज्या पद्धतीने हत्या झाली, त्याच पद्धतीने अमरावतीतसुद्धा उमेश कोल्हे यांच्या गळ्यावर वार करून हत्या केली गेली. दोन्ही घटनांमध्ये बरेच साम्य असल्याचे दिसून येते.
उमेश कोल्हे यांच्या हत्येनंतर कुटुंबीयांसह संपर्कातील मेडिकल व्यावसायिकांची भेट घेतली. नूपुर शर्मा यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानेच त्यांची हत्या झाल्याची बाब पुढे आली. ती पोलिसांपुढे मांडल्यानंतर गृहविभागाकडे तक्रार केली. कारण, स्थानिक पोलिस या तपासाबाबत खरी बाब सांगत नव्हते.
-शिवराय कुलकर्णी, भाजप प्रदेश प्रवक्ते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.