Nagpur RSS : अजितदादांचा 'तो' एकमेव आमदार संघाच्या मुख्यालयात पोहोचलाच, म्हणाला, "पक्षाकडून..."

RSS Headquarter Nagpur : नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचे बौद्धिक होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजप आणि शिवसेनेचे आमदार रेशीमबागेतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत.
Ajit Pawar And RSS
Ajit Pawar And RSS Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News, 19 Dec : राज्याचं हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच गुरूवारी (ता.19) नागपूरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (RSS) मुख्यालयात महायुतीच्या आमदारांचे बौद्धिक होणार आहे. यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह भाजप आणि शिवसेनेचे आमदार रेशीमबागेतील संघाच्या मुख्यालयात दाखल झाले आहेत.

मात्र, उमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) या बौद्धिकासाठी संघाच्या मुख्यालयात अद्याप दाखल झालेले नाहीत. मागील वर्षीही महायुतीचे नेते संघाच्या मुख्यालयात गेले होते. मात्र अजित पवारांनी तिकडं जाणं टाळलं होतं. त्यामुळे आता यंदाही अजित पवारांनी संघ कार्यालयाकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळत आहे.

मात्र, अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे (Raju Karemore) हे मात्र रेशीमबागेत दाखल झाल्यामुळे आता चर्चांना उधाण आलं आहे. दरम्यान राजू कारेमोरे संघाच्या मुख्यालयात आले असता त्यांना पत्रकारांनी तुम्हाला पक्षाकडून इथे येण्याबाबत सांगण्यात आले का? असे विचारलं असता त्यांनी मी स्वयंप्रेरणेने संघाच्या मुख्यालयात आलो आहे.

Ajit Pawar And RSS
Ramdas Athawale : डॉ. आंबेडकरांबाबतच्या 'त्या' वक्तव्याप्रकरणी आठवलेंकडून अमित शहांची पाठराखण तर काँग्रेसवर हल्लाबोल

पक्षाकडून याबाबतची कुठलीही सूचना देण्यात आली नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. शिवाय अजितदादा इथे येतील की नाही याबाबत माझी त्यांच्यासोबत चर्चा झालेली नाही. तसंच राष्ट्रवादीचे (NCP) इतर आमदार इथे येणार आहेत की नाही याबाबतची काही कल्पना नसल्याचंही आमदार कारेमोरे यांनी सांगितलं.

Ajit Pawar And RSS
Chhagan Bhujbal : 'तिकडे' काय चालले आहे, हे छगन भुजबळांना अडीच वर्षांनंतर कळाले!

तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी रेशीमबागेत हजेरी लावली. यावेळी माध्यमांशी बोलताना शिंदे म्हणाले, मी पहिल्यांदा रेशीमबागेत आलो नाही, यापूर्वी देखील अनेकदा आलो आहे. संघ परिवाराशी माझे लहानपणापासून संबंध आहे. संघाच्या शाखेमधूनच माझी सुरुवात झाली. नंतर शिवसेनेच्या शाखेत गेल्यानंतर बाळासाहेब आणि दिघे साहेबांच्या विचारांची शिकवण घेतली. संघ परिवार आणि शिवसेनेचे विचार एकसारखे आहेत, असं ते यावेळी म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com