Lok Sabha Election 2024 : ‘खासदार चांगले काम करीत आहेत..‘ गावित कोणाबाबत म्हणाले असं?

Vijay Gavit : गोंदियातील भाषणात केले तोंडभरून कौतुक
Bhandara & Gondia Lok Sabha Election
Bhandara & Gondia Lok Sabha ElectionSarkarnama
Published on
Updated on

Bhandara-Gondia Constituency : आगामी काळात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. गोंदिया-भंडारा लोकसभेवर महायुतीतील राष्ट्रवादी अजित पवार गट आणि भाजपा या दोघांनी दावा केला आहे. अशात राज्याचे आदिवासी विकास मंत्री विजय गावित यांनी भंडारा-गोंदिया मतदार संघाबाबत सूचक विधान केले आहे.

‘गेल्या दोन पंचवार्षिक काळात भाजपने भंडारा-गोंदिया लोकसभेच्या जागेवर विजय मिळविला आहे. आमचे विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनी मागील काळात चांगले कार्य केले आहे. त्यांच्यावर पक्ष अन्याय करणार नाही, अशी आशा आम्हाला आहे’ गावित यांच्या दाव्यामुळे त्यांनी ‘मला पक्ष पुन्हा दुसऱ्यांदा संधी देईल’, या सुनील मेंढे यांच्या वक्तव्याची पाठराखण केली आहे. सडक अर्जुनी येथे आदिवासी कार्यकर्त्याच्या मेळाव्यात गावित बोलत होते.

Bhandara & Gondia Lok Sabha Election
Bhandara Gondia Loksabha Constituency : सुनील मेंढे कारसेवक म्हणून पक्षाच्या नजरेत आले अन् थेट खासदार झाले

भंडारा-गोंदिया लोकसभा निवडणूक महायुतीतून लढवली जाणार आहे. या लोकसभा मतदार संघावर भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानेही दावा केला आहे. त्यातही भाजपामध्ये विद्यमान खासदार सुनील मेंढे यांच्यासोबत भाजप इच्छुकांची गर्दी वाढली आहे. विद्यमान खासदार सुनील मेंढे यांनीही आपले दावेदारी ताकतीने केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून कारसेवक असलेले सुनील मेंढे यांनी मतदारसंघात राम रथयात्रा काढली. रथ यात्रेच्या समारोपाला उपमुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

फडणवीस यांनीही खासदार सुनील मेंढे यांची स्तुती केली. अशात भंडाऱ्याचे पालकमंत्री विजयकुमार गावित यांनीही गोंदियाच्या एका कार्यक्रमात मेंढे यांची पाठराखण केली. त्यामुळे भाजप इच्छुकांच्या घोडदौडीत सुनील मेंढे यांचे नाव अग्रेसर आहे. गोंदिया जिल्हा दोन लोकसभा मतदारसंघात मोडतो. भंडारा-गोंदिया मतदार संघाचे प्रतिनिधीत्व भाजपचे सुनील मेंढे करतात. आगामी निवडणुकीसाठी त्यांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे गडचिरोली लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व सलग दुसऱ्यांदा अशोक नेते करीत आहेत. तिसऱ्यांदाही निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी सुद्धा तयारी सुरू केली आहे. मात्र दोन्ही विद्यमान खासदारांना महायुती पुन्हा संधी देणार की नाही? असा प्रश्न आहे. असे असले तरी दोन्ही नेत्यांनी त्यांची तयारी कायम ठेवली आहे. आपल्यालाच निवडणुकीचे तिकीट मिळणार या विश्वासाने दोन्ही खासदार काम करीत आहेत. अखेरच्या क्षणी महायुतीत कोणता निर्णय होतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे भंडारा-गोंदियासह गडचिरोली लोकसभा मतदार संघाची निवडणूकही रंगतदार ठरणार आहे.

Edited By : Prasannaa Jakate

Bhandara & Gondia Lok Sabha Election
Sunil Mendhe News : जनता दरबारात अधिकाऱ्यांवर बरसले खासदार सुनील मेंढे !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com