MLA Vs Collector : ई-पीक पाहणीवरून आमदाराने जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले

Vijay Rahangdale : सुधारणा करण्याच्या केल्या सूचना
MLA Vijay Rahangdale
MLA Vijay RahangdaleSarkarnama
Published on
Updated on

Gondia Administration : ई-पीक पाहणी ॲपवरून भाजप आमदार विजय राहंगडाले यांनी गोंदिया जिल्हाधिकाऱ्याला चांगलेच सुनावले आहे. शेतकऱ्यांना येत असलेल्या समस्येमुळे तत्काळ कामात सुधारणा करण्याची सूचना त्यांनी केली आहे.

शेतकऱ्यांना खसरा नोंद करण्यासाठी मागील तीन वर्षांपासून महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने ई-पीक मोबाईल अॅप कार्यान्वित केले आहे. शेतकऱ्यांना आपल्या बांधावर जावून पिकाचे फोटो काढत खसरा नोंद करण्याचे आदेश आहेत. गोंदियात बहुतांश शेतकऱ्यांजवळ अद्याप अन्ड्रॉइड मोबाइल उपलब्ध नाहीत. त्यामुळे त्यांना इतरांची मदत घ्यावी लागते.

MLA Vijay Rahangdale
Gondia News : पोषण आहाराबाबत कर्मचारी ‘अपडेट’ झालेच नाहीत

बहुतांश गावांमध्ये नेटवर्कची अडचण असल्याने खसरा नोंदीमध्ये चुका आढळून येतात. ई-पीक पाहणी अॅपमध्ये खसरा नोंद करण्यासाठी मर्यादित कालावधी आहे. एकदा नोंद करण्यात आलेली माहिती कालावधी गेल्यावर दुरुस्त करता येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी होत आहे. त्यामुळे ई-पीक पाहणी अॅपमध्ये सुधारणा करावी, अशी सूचना आमदार विजय रहांगडाले यांनी केली आहे.

महसूल विभागाच्यावतीने दिलेल्या सूचनेनुसार शेतकऱ्यांना ई-पीक मोबाईल अॅपमध्ये बांधावर जातन पिकांचे फोटो व खसरा नोंद करणे अतिआवश्यक आहे. परंतु, ग्रामीण भागातील बहुतांश शेतकऱ्यांना अनेक तांत्रिक माहिती नसल्याने खसरा नोंद करताना अडचण येत आहे. ज्या शेतकऱ्यांनी ई-पीक अॅपमध्ये खसरा नोंद केली आहे, त्यांनाच शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर विक्री करता येते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तांत्रिक अडचणीमुळे खसरा नोंद झाली नाही असे शेतकरी शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान विक्रीपासून वंचित राहतात. ही खसरा नोंद दुरूस्त करण्याची सुविधा तलाठ्यांच्या लॉगीनमध्ये दिल्यास शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या दूर करता येतील. तेव्हा खसरा दुरुस्त करण्याची सुविधा तलाठ्यांच्या लॉगीनमध्ये देण्यात यावी. खरीप व रबी हंगामात नियमित पिकपेरा भरण्याची सुविधा तलाठी लॉगीनमध्ये देण्यात यावी, शासकीय आधारभूत धान खरेदीची नोंदणी सुरू असेपर्यंत लिंक सुरू ठेवण्यात यावी, अशी सूचना आमदार विजय रहांगडाले यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले आहे.

ॲपमध्ये नोंदणी करत असताना येत असलेल्या अडचणी राज्यात इतर ठिकाणीही पाहायला मिळत आहे. त्यामुळे या अडचणीचा सामना अनेक ठिकाणी अनेक जिल्ह्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी राज्यव्यापी आहेत. यादृष्टीने सरकार दरबारी या ॲपमध्ये असलेल्या अडचणी दूर करणे गरजेचे आहे.

Edited By : Prasannaa Jakate

MLA Vijay Rahangdale
Gondia's Former Minister : गोंदिया जिल्ह्यातील भाजपच्या माजी मंत्रिमहोदयांना कशाची वाटतेय भीती?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com