Congress News : वडेट्टीवार-धानोरकरांमध्ये वादाची ठिणगी; आदिवासी समाजाने घेतली उडी

Political News : विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील ‘समाजवाद' अद्याप मिटला नाही.
Vijay Vadettivar, Pratibha Dhanorkar
Vijay Vadettivar, Pratibha DhanorkarSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : आगामी काळात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षाने सुरु केली आहे, त्यासोबतच त्या अनुषंगाने सध्या तयारी सुरू आहे. त्याचसाठी निवडणूक आयोग महाराष्ट्र दौऱ्यावर आहे. त्यासोबतच काँग्रेसच्या काही प्रमुख नेत्यांची बैठकही नागपूरमध्ये झाली.

काँग्रेसचे नेते तसेच विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay wadettivar) आणि चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर (Prathibha Dhanorkar) यांच्यातील ‘समाजवाद' अद्याप मिटला नसताना कुणबी समाजाच्या उमेदवाराला विधानसभेच्या निवडणुकीत मतदान करणार नाही, अशी भूमिका आदिवासी संघटनांनी स्थापन केलेल्या आदीवासी जमाती सत्ता संपादन परिषदेने जाहीर केली आहे. त्यामुळे आता या वादाला वेगळे वळण लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील वडेट्टीवार यांच्या ब्रम्हपुरी विधानसभा मतदारसंघात झालेल्या कुणबी समाजाच्या मेळाव्यात खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आपल्यावर काही अल्पसंख्याक समाजाचे नेते राज्य करीत असल्याचे सांगून येणाऱ्या निवडणुकीत समाजाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे विधान केले होते. त्यामुळे काँग्रेसमध्ये मोठा वाद निर्माण झाला होता.

काँग्रेसच्या दिल्लीतील नेत्यांनी प्रतिभा धानोरकर यांना समजही दिल्याचे समजते. या दरम्यान चंद्रपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या मेळाव्यात दोन्ही नेत्यांना समोरासमोर बसवून काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्निथाला यांनी समेट घडवून आणला होता. मेळाव्याच्या निमित्ताने चंद्रपूरमध्ये आलेल्या चेन्निथाला व काँग्रेस नेत्यांना खासदार धानोरकर यांनी घरी जेवणाचे आमंत्रण दिले होते. नेमक्या याच वेळी वडेट्टीवार यांनी काही बड्या नेत्यांना आपल्या बँकेत घेऊन गेले. त्यामुळे खासदारांच्या घरी अनेकांना जात आले नाही. यावरून दोघांमधील वाद अद्यापही धुमसत असल्याचे दिसून येते.

Vijay Vadettivar, Pratibha Dhanorkar
Mahayuti News : गंगापुरहून महायुतीमध्ये ठिणगी; भाजपच्या बंब यांच्या विरोधात उतरणार अजितदादांचा आमदार

आदिवासी जमाती सत्ता संपादन परिषदेच्या नेत्यांनी काँग्रेसमधील नेत्यांच्या वादाशी आमचा संबध नसल्याचे सांगितले असले तरी आपली भूमिका मांडताना खासदार धानोरकर यांच्या वक्तव्याचा त्यांनी पुनरुच्चार केला. विदर्भवीर जाबुवंतराव धोटे यांनी स्वतंत्र विदर्भाची चळवळ उभी केली. तेव्हा आदिवासी व हलबा समाजाचे त्यांना मदत केली होती. मात्र, कुणबी समाजाने कधीच मदत केली नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यामुळेच सर्व आदिवासी संघटनांनी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदान करणार नसल्याचा ठराव घेतला असल्याचे सांगितले.

काँग्रेसने स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी स्पष्ट भूमिका घेतली तर ठरावाचा फेरविचार केला जाईल, असे परिषदेचे आदिवासी जमाती सत्ता संपादन परिषदेचे डाॅ. रमेशकुमार गजबे, हरीष उईके, भगवान भोंडे, अरविंद सांदेकर, रवीभाऊ शेंडे, सुधाकर आत्राम, दिनेश सिडाम, गजानन जुगनाके, हितेश मडावी, प्रवीण पाटील, आर. व्ही. गुल्हाने, सिध्दांत पाटील यांनी सांगितले.

Vijay Vadettivar, Pratibha Dhanorkar
MVA News : मुंबईतील पाच जागांवरुन 'मविआ'च घोडं अडलं; 'या' दोन मतदारसंघावरून काँग्रेस, ठाकरे गटात चुरस

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com