Vijay Wadettiwar News: ओबीसी मोर्चा आटोपताच काँग्रेस नेते वडेट्टीवारांची कोंडी; 'तो' व्हिडीओ पुन्हा व्हायरल

Vijay Wadettiwar Vs Manoj Jarange Patil :अडीच वर्षे महायुतीची सत्ता असताना मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला बसले होते. त्यावेळी वडेट्टीवार विरोधी पक्षनेते होते. त्यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी जरांगे यांच्या मागणीला खुले समर्थन दिले होते.
Vijay Wadettiwar, Manoj Jarange
Vijay Wadettiwar, Manoj JarangeSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News: सकल ओबीसी समाजाच्या मोर्चात काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी तुफान भाषण केले. महायुती सरकारला धारेवर धरले. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना अंगावर घेतले. जरांगे पाटील यांच्यावर तुटून पडले. मराठा समाजाला ओबीसी घुसडण्यासाठी काढण्यात आलेल्या जीआरला कडाडून विरोध करताना तो रद्द केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असाही इशारा विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) दिला. शुक्रवारचा मोर्चा आटोपताच विरोधी पक्षनेते असताना त्यांचा एक जुना व्हीडीओ सध्या सोशल मिडायावर व्हायरल करण्यात आला आहे. त्यात ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करताना दिसत आहे.

शुक्रवारचा(ता.10) मोर्चा आटोपताचकाँग्रेस नेते विजय वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते असताना त्यांचा एक जुना व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आला आहे. त्यात ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करताना दिसत आहे.

अडीच वर्षे महायुतीची सत्ता असताना मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या उपोषणाला बसले होते. त्यावेळी वडेट्टीवार विरोधी पक्षनेते होते. त्यांनी जरांगे पाटील यांच्या उपोषणाला भेट दिली होती. त्यावेळी त्यांनी जरांगे यांच्या मागणीला खुले समर्थन दिले होते. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्या ही माझी भूमिका आहे. मराठवाड्यातील मराठा समाज हे ओबीसी आहेत, हे मला माहीत आहे.

मराठा समाजाला ओबीसी समाजातून आरक्षण देण्याची मागणी आली तेव्‍हा तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी बैठका बोलावली होती. त्यात कुणबी म्हणून पुरावे मागण्यात आले होते. त्यावर एक कमिशन नेमले होते. मात्र एकही बैठक घेतली नाही. एक ओबीसी नेता म्हणून मराठवाड्यातील मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देण्यात यावे, ही माझी इच्छाच नव्हे तर तीच माझी भूमिका आहे.

Vijay Wadettiwar, Manoj Jarange
Yogesh Kadam Tweet: फडणवीसांचा घायवळ प्रकरणावर मोठा खुलासा; योगेश कदमांचं काही वेळातच सूचक ट्विट; म्हणाले,'छोटी मोठी वादळं...'

निजामाच्या काळा मराठवाड्यातील मराठा समाज हा कुणबीच होता. मात्र त्याचा फायदा तुम्ही घेतला नाही. विदर्भातील ओबीसी समाजाने घेतला असे ते ठासून सांगताना दिसत आहे. सकल ओबीसी समाजाच्या आंदोलनाची वेळ साधून हा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. ओबीसी समाजाचे आंदोलन, त्यात आज वडेट्टीवारांनी जाहीर केलेली भूमिकेचे टायमिंग साधून हा व्हीडीओ व्हायरल करण्यात आला आहे.

हो मी माझ्या भूमिकेवर ठाम...

मात्र,विजय वडेट्टीवार यांनी आपल्या भाषणात याचा आधीच उल्लेख केला. ते म्हणाले, हो मी जाहीरपणे जरांगे पाटील यांच्या भूमिकेशी सहमत अशी भूमिका मांडली होती. त्यावेळी मराठवाड्यात 8300 नोंदी होत्या. त्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नव्हता. मात्र, शिंदे समिती आली. त्यांनी केलेल्या शिफारसीनंतर दोन वर्षांत 2 लाख 41 हजार प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.

Vijay Wadettiwar, Manoj Jarange
Devendra fadnavis Politics: देवेंद्र फडणवीस यांचे निवडणुकीबाबत सूचक संकेत, म्हणाले, तर मैत्रीपूर्ण लढती होतील!

आता तर रोज हजार प्रमाणपत्रांचे वाटप केले जात आहे. चुलत्याच्या चुलत्याचे दाखले देऊन कुणबी जातीचे प्रमाणपत्र दिल्या जात आहेत. ते पहेलवान आहेत. हिंद केसरी आहेत. ओबीसी समाजात घुसखोरी करून कुपोषित माणसाला घराबाहेर काढण्याचे काम केले जात आहे. याकरिता आज माझा मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास विरोध असल्याचे वडेट्टीवारांनी स्पष्ट केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com