Anil Tatkare Meet Pawar : पवारांची पॉवरफुल खेळी; सुनील तटकरेंच्या विरोधात भावाला ताकद, मुंबईत भेट

Sharad Pawar Group News : तेव्हापासून तटकरे कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होते. अनिल आणि अवधूत तटकरे यांनी २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.
Anil Tatkare -Sharad Pawar
Anil Tatkare -Sharad PawarSarkarnama

Mumabi News : खासदार सुनील तटकरे यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठा डाव टाकला आहे. तटकरेंचे बंधू, माजी आमदार अनिल तटकरे हे शरद पवारांना भेटण्यासाठी मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. रायगड आणि श्रीवर्धनमध्ये तटकरेंना मात देण्यासाठी पवारांची ही खेळी असावी, अशी चर्चा राज्याच्या राजकारणात रंगली आहे. (Sunil Tatkare's brother Anil Tatkare meet Sharad Pawar)

खासदार सुनील तटकरे हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तटकरे यांना मात देण्यासाठी शरद पवार यांनी माजी आमदार अनिल तटकरे यांच्या माध्यमातून रायगड आणि श्रीवर्धनमध्ये तयारी सुरू केली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अनिल तटकरे हे आज शरद पवार यांच्या भेटीसाठी वाय. बी. सेंटरमध्ये दाखल झाले आहेत. ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करू शकतात, अशीही चर्चा आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Anil Tatkare -Sharad Pawar
Vijaykumar Gavit News : पालकमंत्री गावित उदार झाले अन्‌ भंडारा जिल्ह्याला तब्बल दीड तासाचा वेळ दिला...

दरम्यान, तटकरे कुटुंबीयांमध्ये २०१९ पासून मतभेद निर्माण झाले आहेत. तत्पूर्वी शरद पवार यांच्या मध्यस्थीनंतर सुनील तटकरे आणि अनिल तटकरे यांच्यात तडजोड झाली होती. मात्र, ती जास्त काळ टिकली नव्हती. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीच्या तोंडावर माजी आमदार अनिल तटकरे आणि त्यांचे चिरंजीव तत्कालीन आमदार अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता.

अनिल तटकरे यांचे सुपुत्र अवधूत तटकरे यांना डावलून २०१९ मध्ये सुनील तटकरे यांनी आपली मुलगी आदिती तटकरे यांना श्रीवर्धन मतदारसंघातून विधानसभेचे तिकीट दिले होते. तेव्हापासून तटकरे कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होते. अनिल आणि अवधूत तटकरे यांनी २०१९ मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना एकत्र आल्याने अवधूत हे नाराज होते, त्यामुळे त्यांनी गेल्या वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला होता. अनिल तटकरे हे राजकारणापासून काहीसे अलिप्त होते. आता हे पिता-पुत्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीत येऊ शकतात.

Anil Tatkare -Sharad Pawar
Cabinet Expansion : सुनील शेळकेंनी टायमिंग साधलं; मावळासह ‘एक्स्प्रेस वे’वर झळकलेल्या बॅनर्सची चर्चा!

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सुनील तटकरे हे अजित पवार यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रााहिले. राज्यातील पक्षाची कमान त्यांनीच हाती घेतली आहे. त्यामुळे सुनील तटकरे यांना रायगड आणि आदिती तटकरे यांना श्रीवर्धनमध्ये अडकवून ठेवण्यासाठी शरद पवार गटाकडून अनिल तटकरे यांना ताकद दिली जाऊ शकते. त्यातून ते विधानसभेचे उमेदवारही असू शकतात.

Anil Tatkare -Sharad Pawar
Chandrakant Patil News : मी कशालाही तयार असतो...माझ्या बॅगेत आठ शर्ट असतात; चंद्रकांत पाटील असं का म्हणाले?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com