
Nagpur, 27 February : माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह विधान केले होते. ‘त्या’ विधानावरून राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विशेषतः भाजपकडून वडेट्टीवार यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते. त्याचा वचपा वडेटट्टीवार यांनी स्वारगेट अत्याचार प्रकरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांविषयी बदनामीकारक विधान करणाऱ्या नेत्यांवरून भाजपवर काढला आहे.
विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) म्हणाले, स्वारगेट प्रकरणावरून राज्य सरकारला आमचा इशारा आहे की, गृहखात्यात काय चाललं आहे. गृहखात्याचा आणि कायद्याचा धाकच राहिलेला नाही. सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे गुन्हेगारांना अभय मिळत असल्याचे वाटते आहे. यामध्ये अनेक घटना आहेत.
एकेरी भाषेत उल्लेख केला म्हणून माझ्याविरोधात भाजपच्या लोकांनी आंदोलन केले. दुसरीकडे मात्र, राहुल सोलापूकर, प्रशांत कोरटकर, श्रीपद छिंदम यांच्या निषेधाचा फलकही भाजपच्या लेाकांच्या हाती दिसला नाही. म्हणजे याचा अर्थ असा आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांची (Chhatrapati Shivaji Maharaj) बदनामी करणाऱ्यांना अभय द्यायचं. कारण, तो आपल्या पक्षाचा, कुळाचा आणि आरआरएसचा आहे म्हणून.... याबाबत त्यांची तोंडी का शिवली गेली होती का? त्यांचा निषेध का केला गेला नाही?
मी काहीही वाईट बोललो नव्हतो, तरी माझ्याविरोधात आंदोलन करतात. किती बेईमान विचारांची ही माणसं आहेत, त्यांच्यात किती बेईमानी भरलेली आहे, मग तो शिवाजी महाराजांच्या मृत्यूपासून छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूपर्यंतचा इतिहास पाहिला तर ते दिसून येते. महाराजांची बदनामी करणारे विचार पुसण्याचे काम देवेंद्र फडणवीस करतील का, हा माझा प्रश्न आहे, असेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र महाराजांबाबत ऐकरी उल्लेख करणाऱ्या विजय वडेट्टीवार यांनी माफी मागावी; अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी दिला होता. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले होते. त्याचा वचपा विजय वडेट्टीवार यांनी स्वारगेट बस स्थानकाच्या प्रकरणावरून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थाच्या मुद्यावरून भाजपवर आगपाखड केली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.