

Nagpur News: नागपूर महापालिका प्रशासकाच्या विरोधात आलेल्या एका कर्नलचा व्हिडीओची दखल घेऊन शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांनी दखल घेऊन थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. प्रशासक चौधरी यांच्या 27 महिन्यांच्या कार्यकाळात झालेल्या सर्व घोटाळ्यांची चौकशी करण्याची त्यांनी मागणी केली. या विरोधात येत्या अधिवेशनातही आवाज उठवला जाणार आहे. सरकारला चक्का जाम केल्यावरच जाग येत असेल तर तीसुद्धा आमची तयारी असल्याचा इशाराही विकास ठाकरे यांनी दिला.
धंतोली येथील रहिवासी असलेले कर्नल भागवत यांच्या भूखंडावर आठ मजली एका इस्पितळाची इमारत उभी करण्यात आली आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी कायद्याचा सल्लाही घेतला होता. त्यात ही इमारत असल्याचे मत नोंदवण्यात आले होते. त्यानंतरही महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी इमारतीला मंजुरी दिली.
संबंधित कर्नल यांनी वारंवार तक्रारी केल्या. मात्र त्याची दखल घेतली नाही. ते गुजरातमध्ये तैनात आहेत. त्यांनी महापालिकेच्या गैरकारभाराचा एक व्हिडीओ ठाकरे यांंच्याकडे पाठवला आहे. ठाकरे यांनी महापालिकेतील आणखी एक घोटाळा समोर आणला. एका शैलेंद्र भावे नावाच्या व्यक्तीकडून 20 हजार रुपयांचा मालमत्ता कर घेण्यात आला. एका दलालाने त्यांना कर भरल्याची बनावट पावती दिली
नागपूर महापालिकेच्या सर्वच विभागात दलाला नेमण्यात आले आहे. त्यांच्याकडून वसुली केली जात आहे. त्यांच्यावर कोणाचे नियंत्रण नाही. प्रशासक या नात्याने अभिजित चौधरी याकडे सातत्याने दुर्लक्ष करीत आहे. त्यांच्या कार्यकाळात मोठमोठ्या इमारतींना नियमात नसताना बांधकामाच्या परवानग्या देण्यात आल्या. फायर विभागानेसुद्धा सर्वांना एनओसी दिली आहे.
प्रशासकाच्या कार्यकाळात इमारत, फायर टॅक्स या विभागात पैसे दिल्याशिवाय कामच होत नाही. प्रत्येक विभागात अधिकाऱ्यांनी दलालांची नियुक्ती केली आहे. त्यांच्यामार्फत सर्वसामान्यांना लुबाडले जात आहे. पैसे घेऊन त्यांचे काम केले जात नाही. बोगस पावत्या दिल्या जात आहे. प्रशासक म्हणून नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी महापालिका आयुक्तांची आहे. त्यांचे प्रशासनावर आणि त्यांच्यावर सरकारचे नियंत्रण नाही.
महापालिकेत अंदाधुंद करभार सुरू आहे. पालकमंत्र्यांनी लक्ष द्यायला वेळ नाही. म्हणून आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार केली असल्याचे ठाकरे यांनी सांगितले. या सर्व घोटाळ्याच्या तपासासाठी एक चौकशी समिती किंवा एसआयटी स्थापन करावी. इतका मोठा घोटाळा प्रशासक चौधरी यांच्या कार्यकाळात झाला असल्याचा आरोप विकास ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी आमदार अभिजित वंजारी, संजय महाकाळकर आदी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.