Washim ZP Election : राष्ट्रवादी-शिवसेनेची कॉलर ताठ... भाजपला एक-एका जागेसाठी भांडावं लागणार!

Washim ZP Election : वाशिम जिल्हा परिषदेत महायुतीत जागा वाटपावरून तणाव असून राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा निम्म्या जागांवर दावा असणार आहे. भाजपला कमी जागा मिळाल्यास बंडखोरीची भीती व्यक्त होत आहे.
Washim Zilla Parishad elections as Mahayuti partners—BJP, ShivSena , and NCP
Washim Zilla Parishad elections as Mahayuti partners—BJP, Shiv Sena, and NCPSarkarnama
Published on
Updated on

Washim ZP Election : वाशिम जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा बिगूल वाजला आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी व महायुतीत जागा वाटपाचा तिढा निर्माण होण्याची शक्यता आहे. अशात जिल्हा परिषदेतील दिग्गजांचे मतदारसंघ राखीव झाल्याने हे दिग्गज आता जिल्ह्यातील सुरक्षित मतदारसंघाच्या शोधात आहेत.

जिल्ह्यात जिल्हा परिषद, पंचायत समित्यांसोबतच नगर परिषद व नगर पंचायतीच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. यात महायुती व महाविकास आघाडीकडून एकत्रित निवडणुका लढणार असल्याच्या घोषणा करण्यात आली असली तरी प्रत्यक्ष जागा वाटप करताना राजकीय पक्षाचा कस लागणार आहे.

मागील जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता मिळाली होती. या जिल्हा परिषदेत शिवसेना व काँग्रेस सत्तेत सहभागी होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेची दोन शकलं झाल्यानंतर अमित खडसे यांचा अपवाद वगळता जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांकडे गेली. शिवसेना मात्र अभंग राहिली. काँग्रेस जैसे थे राहिली. आता जिल्हा परिषद निवडणुकीला सामोरे जाताना महायुतीत जागा वाटप करताना नेत्यांचा कस लागणार आहे.

Washim Zilla Parishad elections as Mahayuti partners—BJP, ShivSena , and NCP
Dattatray Bharane Solapur Tour : राष्ट्रवादीच्या ‘डॅमेज कंट्रोल’साठी अजितदादांचे विश्वासू दत्तामामा सोलापूर दौऱ्यावर; नाराजांची समजूत काढणार?

महायुतीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार या तीन पक्षात ५२ जागा वाटाव्या लागणार आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सर्वात मोठा पक्ष आहे. जिल्हा परिषदेत या पक्षाचे १६ सदस्य होते. शिवसेना नेत्या भावना गवळी यांनी गेल्या वर्षभरात ग्रामीण भागात पक्षाला चांगलाच जनाधार मिळवून दिल्याने किमान निम्म्या जागांवर या शिवसेनेचाही दावा राहणार आहे.

Washim Zilla Parishad elections as Mahayuti partners—BJP, ShivSena , and NCP
Bhavna Gawali News: भावनाताईंचा विश्वासघात तुम्हाला महागात पडेल; महिला जिल्हाप्रमुखाचा मुख्यमंत्र्यांना थेट इशारा

त्यामुळे भाजप राज्यातील सत्ते मोठा भाऊ असला तरी या पक्षाच्या वाट्यावर कमी जागा येण्याची शक्यता असून बंडखोरी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यात जिल्ह्याच्या भाजपत दोन गट निर्माण झाल्याने हा शहरी तोंडावळ्याचा पक्ष ग्रामीण भागात किती मुसंडी मारेल, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

दुसरीकडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचा आसेगाव गट आरक्षित झाल्याने त्यांना दुसरा मतदारसंघ शोधावा लागणार आहे. माजी शिक्षण सभापती चक्रधर गोटे, माजी बांधकाम सभापती सुरेश मापारी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दिलीप देशमुख यांचेही मतदारसंघ राखीव झाल्याने यांना आता दुसरे मतदारसंघ शोधावे लागणार आहे.

दिग्गजांचा लागणार कस :

एकीकडे वर्षानुवर्षे जिल्हा परिषदेत सत्ताकारण गाजवणारे दिग्गज दुसऱ्या मतदारसंघाच्या शोधात असले तरी नवख्या मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी त्यांचा कस लागणार आहे. त्यात त्या मतदारसंघातील स्थानिकांची नाराजी ओढवून विजय मिळविणे कठीण होणार आहे. या मतदारसंघाच्या अदलाबदलीने अनेक पक्षात बंडाळी उफळण्याचे संकेत मिळत असल्याने या वर्षीची जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक चुरशीची होणार असल्याचे चित्र आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com