Sharad Pawar Resignation : १५ दिवस आधीच सगळं ठरलं होतं..; शरद पवारांच्या राजीनाम्याबाबत भूजबळांचा गौप्यस्फोट

Nashik Politics : शरद पवार यांनी केलेल्या टिकेला छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले.
Sharad Pawar Resignation :
Sharad Pawar Resignation :Sarkarnama
Published on
Updated on

Chagan Bhujbal on Sharad Pawar : "पुस्तक प्रकाशनाच्या वेळेला आपण राजीनामा देणार असल्याचं साहेबांनी जाहीर केलं. या राजीनाम्याची १५ दिवस आधीपासून चर्चा होती. सुप्रिया ताईंनी मला सांगितलं. मी साहेबांशी चर्चा केली. सुप्रिया ताईंनी राष्ट्रीय पक्ष बघावा आणि अजित दादांनी महाराष्ट्रात पक्ष सांभाळावा, आणि हे प्रकरण मिटवून टाकावं, हे सगळं ठरलं होतं. पण तीन दिवसांनी त्यांनी अचानक माघार घेतली." असा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांनी केला आहे. म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले, माघारच घ्यायची होती, तर राजीनामा दिलाच कशाला असं म्हणाले. असंही भूजबळ यांनी सांगितलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी येवला दौऱ्यात काल छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्या मतदारसंघात सभा घेतली. यावेळी पवार यांनी केलेल्या टिकेला छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत उत्तर दिले. 'परत त्यांनी निरोप पाठवला , दिल्लीच्या मेळाव्यात सुप्रिया ताईंना कार्याध्यक्ष म्हणून नियुक्त करायचं. पण प्रफुल्ल पटेल राजीनामा द्यायला निघाले होते. पण मी समजावून सांगितलं की दोघेही कार्याध्यक्ष व्हा, तुमचं नाव पहिलं घेतील आणि सुप्रिया ताईंचं नाव दुसरं असेल. असाही खुलासा छगन भूजबळ यांनी केला आहे.

२०१४ मध्ये तुम्ही शिवसेना सोडली, की आम्हीही काँग्रेस सोडू, आणि निवडणुकीनंतर काही महिन्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत सामील होईल, असं पवार साहेबांनी सांगितलं होतं. शरद पवार साहेबांनीच सेनेला भाजपपासून दूर केलं, आम्हीही काँग्रेसपासून दूर झालो, सर्व पक्ष वेगवेगळे लढले.

आमच्या आमदारांची संख्या कमी होती म्हणून आम्ही भाजपला बाहेरुन पाठिंबा दिला. पण अचानक आमचा पाठिंबा कायम धरु नका, असं भाजपला सांगण्यात आलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेच्या काही मंत्र्यांना सत्तेत सामील करुन घेतलं. , असा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते छगन भूजबळ यांनी केला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com