
Nashik, 22 December : राज्यात आता अडीच वर्षे संधी नाही. पण, छगन भुजबळांना (Chhagan Bhujbal) केंद्रात संधी दिली तर ते केंद्रातही नेतृत्व करतील. निधीच्या बाबत भुजबळांना सर्वकाही माहिती आहे. आम्हाला अडचण येते, तेव्हा आम्ही भुजबळांकडे जातो. आता कुठेतरी दुरावा झाला आहे, त्यांना जवळ आणण्यासाठी आम्ही प्रयत्न केले पाहिजे, त्यातूनच आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवारांची परवानगी घेऊन भुजबळांना भेटायला जाणार आहोत, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी स्पष्ट केले
आमदार हिरामण खोसकर (Hiraman Khoskar) म्हणाले, माणिकराव कोकाटे यांच्या रुपाने नाशिकला कृषीसारखे मंत्रिपद मिळाले आहे, त्याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. नोटबंदीपासून शेतकरी अडचणीत आहेत. नाशिक जिल्हा बॅंक अडचणीत आहे. ती बॅंक वाचविण्यासाठी मी गेल्या दोन वर्षांपासून प्रयत्न करत आहे. आजही तो विषय मांडला आहे. सर्व आमदारही प्रयत्न करत आहेत.
अजितदादांनी मनाचा मोठेपणा दाखवून नाशिक जिल्ह्याला दोन कॅबिनेट मंत्री दिली आहेत. निवडणुकीनंतर आम्ही अजित पवारांना (Ajit Pawar) भेटायला गेलो, तेव्हा त्यांनी सांगितलं की नाशिककरांनी माझ्यावर खूप प्रेम केले. माझे सातच्या सात आमदार निवडून दिले आहेत. त्यामुळे अजितदादांनाही वेगळा आनंद आहे. त्या आनंदाच्या भरातच त्यांनी नाशिकला दोन कॅबिनेट मंत्रिपदं दिली आहेत, असेही खोसकर यांनी म्हटले आहे.
नाशिक जिल्ह्याला आदिवासी विकास मंत्रिपद मिळेल, अशी अपेक्षा हेाती. राज्यात आदिवासी २५ आमदार आहेत. त्या पैकी तीन आमदार हे काँग्रेसचे आहेत. उर्वरीत २२ आमदार हअे महायुतीचे असून त्यात १२ आमदार हे भाजपचे आहेत. त्यामुळे आमदारांचे मेरिट लावून हे खाते भाजपकडे घेतले आहे. आदिवासी विकास मंत्रालय नरहरी झिरवाळ यांना मिळावं, अशी आम्ही अजित पवार यांच्याकडे आग्रह केला होता. झिरवाळ यांना आदिवासी विकास मंत्रालय दिले असते तरी चांगलं काम झालं असतं, असा दावाही आमदार खोसकरांनी केला.
खोसकर म्हणाले, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अजित पवार हे नक्कीच कुठेतरी संधी देतील. राष्ट्रवादी काँग्रेस हे आमचे कुटुंब आहे. कुटुंबांत थोडं फार चालू राहतं. मी आणि नरहरी झिरवाळ परवा भुजबळ यांच्याकडे जाणार आहोत. त्यांना आम्ही विनंती करणार आहोत. आपल्या नेत्याला पद मिळालं नाही; तर कार्यकर्ते नाराज होतात. पण, आम्ही अजितदादांची परवानगी घेऊन भुजबळसाहेबांना भेटायला जाणार आहोत. केंद्रात संधी मिळाली तर नाशिकला मोठा निधी आणता येईल, त्यासाठी आम्ही भुजबळांना विनंती करणार आहोत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.