DPDC Meeting : भाजपची तारेवरची कसरत, जिल्हा नियोजन समितीत कोणाला संधी?

DPDC Meeting Nagpur Chandrashekhar Bawankule :नागपूर जिल्ह्या नियोजन समितीत शहर आणि ग्रामीण भागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे सहा सदस्यांना नियुक्त करण्यात आले होते. आत्ता यातील कोणला संधी मिळणार याची चर्चा सुरू आहे.
Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar BawankuleSarkarnama
Published on
Updated on

DPDC Meeting : मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर नागपूर जिल्ह्याची पहिली जिल्हा नियोजन समितीची बैठक एक फेब्रुवारीला पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बोलावण्यात आली आहे. त्यामुळे माजी सदस्यांपैकी कोण आत राहणार आणि कोण बाहेर जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

राज्य शासनाने 28 जानेवारीला आदेश काढून नियोजन समिती बरखास्त केली आहे. याची माहिती अद्याप सदस्यांना देण्यात आली नाही. मात्र शासनादेश काढण्यात आला असल्याने प्रत्येकाला वैयक्तिक माहिती देण्याची गरज नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

समिती अस्तित्वात नसली तरी सर्वसाधारण बैठक घेता येते. पालकमंत्री आणि आमदार या बैठकीला उपस्थित राहतात. जिल्ह्याच्या विकास आराखड्यावर चर्चा आणि प्रस्तावित कामांची यादी या बैठकीत सादर केली जाणार आहे.

Chandrashekhar Bawankule
Raj Thackeray : 'माझा आणि ईडीचा संबध काय?', राज ठाकरेंनी मेळाव्यात सांगितलं

नागपूर जिल्ह्या नियोजन समितीत शहर आणि ग्रामीण भागातून राष्ट्रवादी काँग्रेसचे आणि शिवसेनेचे सहा सदस्यांना नियुक्त करण्यात आले होते. यापैकी राष्ट्रवादीचे सदस्य सतीश शिंदे हे शरद पवार गटात सहभागी झाले होते. त्यामुळे त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. त्यांची नियुक्ती अर्थमंत्री अजित पवार यांनी केली होती.

याशिवाय राष्ट्रवादीचे शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर आणि प्रदेश उपाध्यक्ष अनिल अहिरकर यांचीही नियुक्ती करण्यात आली होती. मात्र अहीरकर या नियुक्तीवर नाराज होते. त्यांना नागपूर सुधार प्रन्यासच्या विश्वस्तपदाची मागणी केली होती. ते एकाही बैठकीत उपस्थित राहिले नाहीत. त्यामुळे आता जिल्हा नियोजन समितीवर राष्ट्रवादी काँग्रेसमधून कोणाची नियुक्ती केली जाते याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.

मागील सरकारच्या काळात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने मंगेश काशीकर यांच्यासह सहा जणांना जिल्हा नियोजन समितीत सामावून घेण्यात आले होते. सध्या शिवसेनेचे आशिष जयस्वाल राज्यमंत्री आहेत. याशिवाय कृपाल तुमाने विधान परिषदस सदस्य आहेत. ते पदसिद्ध सदस्य म्हणून समितीत राहणार आहेत. काशीकर हे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जवळचे आहेत. याशिवाय ते भाजपलाही चालणारे आहेत. त्यामुळे त्यांना पुन्हा संधी मिळू शकते.

जिल्हा नियोजन समितीत नियुक्ती करताना भाजपला सर्वाधिक कसरत करावी लागणार आहे. त्यांचे ग्रामीणमध्ये पाच आणि शहरात चार आमदार आहेत. प्रत्येक आमदारांकडून त्यांच्या समर्थकांची नावे रेटली जात आहेत.

Chandrashekhar Bawankule
Shiv Sena-BJP Alliance : शिवसेना-भाजप युती तुटण्यामागचा खलनायक कोण? राऊतांनी थेट नावच घेतलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com