Rahul Gandhi News : पीएम मोदींची झोप का उडाली ? राहुल गांधींनी सांगितले नेमके कारण

Political News : संविधान सन्मान संमेलनात राहुल गांधी काय बोलणार, कोणावर निशाणा साधणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यांच्या येण्याने राजकीय धुरळा उडला आहे.
Rahul Gandhi, Narendra Modi
Rahul Gandhi, Narendra ModiSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : संविधान सन्मान संमेलनात राहुल गांधी काय बोलणार, कोणावर निशाणा साधणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली होती. त्यांच्या येण्याने राजकीय धुरळा उडला आहे. राहूल गांधी यांनीसुद्धा अपेक्षेप्रमाणे राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर थेट निशाणा साधला. यावेळी मी जातीनिहाय जनगणनेची मागणी केली तेव्हापासून मोदी यांची झोप उडाली असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.

संविधान संमेलनात त्यांनी पुन्हा जातीनिहाय जनगणनेवर भर दिला. कुठल्याही परिस्थिती जातीनिहाय जनगणना आपण करणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. मी एम्प्लिफायर आहे. दलित, आदिवासी, गोरगरीब, शेतकऱ्यांचा आवाज ऐकतो. त्यांच्या समस्या जाणून घेतो आणि त्या मांडतो, लोकांसमोर पोहचवतो. मात्र हीच बाब भाजपला खटकत असल्याचे राहुल गांधी (Rahul Gandhi) म्हणाले. (Rahul Gandhi News)

जातीनिहाय जनगणेच्या मागणीमुळे भाजपच्या (BJP) अनेक नेत्यांची झोप उडाली आहे. असमानतेचा मुख्य स्रोत जात हाच आहे. भारतामधील सर्वाधिक असमानता जातींमुळे निर्माण झाली आहे. ही असमानता दूर करायची असले तर जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे असेही ते म्हणाले. भारताच्या विकासात दलित, आदिवासिंचा सहभाग दिसत नाही. आपला उद्देश जातिनिहाय जनगणना व आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादा हटवणे असल्याचे त्यांनी सांगितले.

मी जेव्हा जातीनिहाय जनगणेचा मुद्दा उपस्थित करतो ते तेव्हा ते म्हणतात राहुल गांधी देश तोडायला निघाले आहेत. मात्र, यापासून हटणारा मी नाही. मी 90 टक्के लोकांचे प्रतिनिधित्व करतो. त्या सर्वांची हीच मागणी आहे. लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे. संविधान हे जगण्याचा मार्ग आहे. भारताचा आवाज आहे. बुद्ध, फुले, शाहू यांच्या विचारांचा समावेश त्यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केला असे राहुल गांधी यांनी संगितले.

Rahul Gandhi, Narendra Modi
MVA News : पुण्यातील बंडोबांचा थंडोबा करण्यात महाविकास आघाडी अपयशी

संविधानाचा मुख्य गाभा समानता आहे. प्रत्येक जाती, धर्माला समानतेची वागणूक देण्याचा विचार त्यात मांडण्यात आला. संविधान संपले तर शिक्षण आणि आरोग्य सेवा संपुष्टात येईल, असाही धोका राहूल गांधी यांनी व्यक्त केला.

भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सरळ सरळ संविधानावर आक्रमण करत नाहीत तर छुपे हल्ले करतात. त्यास विकास तर कधी सुधारणा असे गोंडस नाव देतात. ज्या वेळी ते संविधानावर थेट हल्ला करतील, त्या दिवशी त्यांना घरी बसावे लागले. हे त्यांना चांगलेच ठावूक आहे. देशातील 90 टक्के लोकांकडे सत्ता आणि पैसा नाही. त्याशिवाय प्रतिष्ठा काही कामाची नसल्याचे राहूल गांधी यांनी सांगितले.

Rahul Gandhi, Narendra Modi
Marathwada Politics : मराठा आरक्षण आंदोलन, 'मविआ'ची वाढलेली ताकद महायुतीला पुन्हा जेरीस आणणार?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com