Shiv Sena Kolhapur : कोल्हापूर 'उत्तर'वरून ठाकरे गट इरेला पेटला, काँग्रेस आघाडी धर्म पाळणार?

Kolhapur shiv sena Thackeray Group politics : कोल्हापूर उत्तरवरून महाविकास आघाडीमध्ये चांगलेच ईर्षेचे राजकारण सध्या सुरू आहे. काँग्रेस आघाडी धर्म पाळणार?
Kolhapur shiv sena Thackeray Group
Kolhapur shiv sena Thackeray Group Sarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर उत्तरवरून महाविकास आघाडीमध्ये चांगलेच ईर्षेचे राजकारण सध्या सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीची जागा काँग्रेसला दिल्यानंतर राष्ट्रवादी विधानसभा निवडणुकीत या जागेवर आपला दावा ठाम सांगून हट्टाला पेटली आहे. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीत स्पर्धा सुरू झाली असताना आता शिवसेना ठाकरे गटाने देखील या जागेवर आपला दावा ठोकला आहे. त्या संदर्भात नुकताच मेळावा घेत ठाकरे गटाने कोल्हापूर उत्तरची जागा आपलीच असल्याचे सांगत पोट निवडणुकीत ही जागा काँग्रेसला मिळताच आम्ही आघाडी धर्म पाळला आहे. त्यामुळे आता विधानसभेला ही जागा शिवसेनेचीच राहील असे जाहीर आव्हान मेळाव्यातून देण्यात आले आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील निवडणूक शिवसेनेने (Shivsena) आठ वेळा लढवलेली आहे. एकवीरा या ठिकाणाहून विजय मिळवला आहे. तर पोटनिवडणुकीत महाराष्ट्रात आघाडीमध्ये काँग्रेसला ही जागा गेल्यानंतर शिवसेनेने आघाडी धर्म पाळला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने ही जागा शिवसेनेला सोडावी आणि आघाडी धर्म पाळावा. असा सुर या मेळाव्यात शिवसैनिक आणि व्यक्त केला.

Kolhapur shiv sena Thackeray Group
Shiv Sena News: इंगवले यांनी पक्षाची शिस्त मोडली; उपनेते संजय पवारांनी थेट सांगितले

शिवसेनेचे उपनेते संजय पवार (Sanjay Pawar) यांनी म्हणाले, 'गेली तीस ते पस्तीस वर्षे मी एक पक्षाशी एकनिष्ठ आहे. अनेक वर्ष या पक्षात मी प्रामाणिकपणे काम करत आहे. त्यामुळे उमेदवारी मला मिळावी अशी माझी इच्छा आहे. आपल्या पक्षात कुणालाही उमेदवारी मिळाली तर आपण गद्दारी करणार नाही. पक्ष देईल त्या उमेदवाराचा प्रामाणिकपणे प्रचार करेन', असे स्पष्टीकरण संजय पवार यांनी दिले.

Kolhapur shiv sena Thackeray Group
Video : कोल्हापुरात ठाकरेंच्या सेनेत 'ऑल इज नॉट वेल', शहरप्रमुखांची जिल्हाप्रमुखांविरोधातील कॉल रेकॉर्डिंग व्हायरल...

तर उमेदवारीसाठी मीही इच्छुक आहे. पण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी कोणालाही उमेदवारी दिल्यास त्यासाठी आपण मॅन, मनी, मसल आणि पॉवर यासह आपण प्रचार करणार. जर दक्षिण विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांना 40,000 ची मताधिक्य मिळू शकते. तर लोकसभेला 6000 चे मताधिक्य कसे काय मिळाले याचाही अभ्यास करावा, अशी कोपरखळी रविकिरण इंगवले यांनी लगावली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com