Winter Session 2023 : अजितदादांना आता मुख्यमंत्री करा, मी माझ्या पक्षाच्या पाठिंब्याची हमी घेतो; शिवसेना नेत्याची ऑफर

Ajit Pawar CM Post : तुम्ही ज्याच्या ज्याच्याबरोबर मैत्री कराल, त्याचं तुम्ही वाटोळं कराल, हे मी तुम्हाला आज सांगतो.
Bhaskar Jadhav
Bhaskar JadhavSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : अजितदादांना आता मुख्यमंत्री करा. सभागृहात माझ्या पक्षाच्या वतीने पाठिंबा देतो, ठराव मांडतो. मला तुमच्यातील दम बघायचा आहे. माझ्या पक्षाची हमी मी घेतो. दादांना मुख्यमंत्री करा, असे खुले चॅलेंज शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी भारतीय जनता पक्षाला दिले. (Make Ajitdada Chief Minister; I support my party: Bhaskar Jadhav)

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर बोलताना भास्कर जाधव यांनी कोकणाच्या विकासाचा मुद्दा मांडला. त्यावेळी सत्ताधारी बाकावरून कोणीतरी अजितदादांना अडीच वर्ष मुख्यमंत्री केलं असतं तर...अशी कमेंट कोणीतरी केली. त्यावेळी जाधव यांनी भारतीय जनता पक्षाचा समाचार घेताना तुम्ही ज्याच्या ज्याच्याबरोबर मैत्री कराल, त्याचं तुम्ही वाटोळं कराल, हे मी तुम्हाला आज सांगतो.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Bhaskar Jadhav
Winter Session 2023 : 'एनआयए'च्या कारवाईचा मुद्दा उपस्थित करताच अबू आझमींवर भाजप आमदार तुटून पडले

तुम्हाला (भाजप) महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांशिवाय काही सूचत नाही का. नाना तुमच्यासारख्यांनी तर हे बोलू नये. मी कोणावरही टीका केली नाही. ह्यांचं ते सारखं अडीच वर्ष.... अडीच वर्षातून अजून हे बाहेर पडले नाहीत. तुम्ही भारतात कोरोना का आणला, तुम्ही वेळेवर विमानसेवा का बंद केली नाही. का तिथं झोपळ्यावर ढोकळा आणि फापडा खात बसले होते. त्यानंतर तुम्ही देश बंद केला, असा सवालही त्यांनी केला.

कोरोना तुमच्यामुळे आला आणि महाराष्ट्र ठप्प झाला. तुम्हाला कोण बोलत नाही म्हणून.... चीनचे नाव कसले घेतात, पॅंटी ओल्या होतात यांच्या. हे कसले नाव घेतात. ह्यांच्यात दम काय आहे. तुम्हाला जिकडे जाल तिकडं खाण्याशिवाय काही दिसत नाही. यूपी बिहारमध्ये गंगेत प्रेतं वाहत होती आणि महाराष्ट्रात योग्य पद्धतीने अंत्यसंस्कार हेात होते, हेच त्यांना खुपतंय. महाराष्ट्र सरकारच्या कोरोना हाताळण्याच्या कामाचे जागतिक आरोग्य संघटना, सर्वोच्च न्यायालय, संसद, राष्ट्रपती आणि जगाने कौतुक केले आहे, असा दावाही त्यांनी केला आहे.

Bhaskar Jadhav
Shahajibapu Vs Mohite Patil : मोहिते पाटील समर्थकांचा शहाजीबापूंवर पलटवार: ‘ज्यांचा फक्त रात्रीच पाण्याशी संबंध येतो, त्यांनी...’

भास्कर जाधव म्हणाले की, मी कोणावरही टीका टिपण्णी केली नाही. देवेंद्र फडणवीस यांनी चांगले निर्णय घेतले तर मी चांगलेच बोलतो. त्यांचं पुढे काही झालं नाही, हे मी सांगतो. ह्यांचं आपलं अडीच वर्ष, अडीच वर्ष चाललं आहे. ह्यांना दुसरं काही दिसत नाही.

अजितदादा होते ना महाविकास आघाडीमध्ये. नव्हते कसे. नाही कोण म्हणतंय. ते काय नाही म्हणतात का. मीही तेच म्हटलं. आताही ते मंत्रिमंडळात आहेत. तरीही मी त्यांनाच साद घालतोय. ती त्यांनाच साद घालतोय, जेथून प्रश्न सुटणार असतील, तिथून ते सोडवले पाहिजेत. त्यांचं काय अडीच वर्ष अडीच वर्ष. ह्यांना सकाळ-संध्याकाळ अडीच वर्ष खुपतंय.

Bhaskar Jadhav
Assembly Winter Session : जयंतरावांचे चिमटे अन्‌ कोपरखळ्या : ‘ट्रीपल इंजिनमुळे ट्रबल वाढला, जे दादांना कळलं, ते तुम्हाला...’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com