Yavatmal District Bank Election : आघाडीकडे स्पष्ट बहुमत, तर महायुतीची ‘साम, दाम, दंड, भेद’ची तयारी !

Mahavikas Aghadi : महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे.
Yavatmal District Central Cooperative Bank
Yavatmal District Central Cooperative BankSarkarnama

Yavatmal Political News : शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक आज होऊ घातली आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे मनीष पाटील तर महायुतीकडून राजुदास जाधव यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. (Mahavikas Aghadi has a clear majority)

महायुतीने उमेदवार देत महाविकास आघाडीपुढे आव्हान निर्माण केले असले तरी महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत आहे, तर महायुतीकडून साम, दाम, दंड, भेद अशा सर्वच बाजूंनी रणनीती आखली गेली आहे. त्यामुळे मनीष पाटील यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे. असे असले तरी मतदानापूर्वी काहींचा अंतर्गत विरोध शमविण्याचे आव्हान महाविकास आघाडीच्या नेत्यांपुढे आहे.

लोकसभा, विधानसभा निवडणुका अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या स्थितीत शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखली जाणारी येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आपल्याच ताब्यात यावी, यासाठी महायुती आणि महाविकास आघाडीमधील घटक पक्षांची चढाओढ लागली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्यात दोन गटांत विभागली गेली आहे.

त्याचे राजकीय परिणामही जिल्हा बँक अध्यक्षांच्या निवडीत दिसून येत आहेत. जिल्हा बँकेत संचालक असलेल्या सर्वच पक्षांनी अध्यक्षपदावर दावा केला होता. त्यामुळे नेत्यांची चांगलीच गोची झाली होती. दरम्यान, आज निवडणुकीच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांना अध्यक्षपदाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात यश आले.

महायुतीने स्पष्ट बहुमत नसताना शिवसेना-एकनाथ शिंदे गटाचे राजुदास जाधव यांना रिंगणात उतरवत महाविकास आघाडीपुढे आव्हान निर्माण केले आहे. मात्र, स्पष्ट बहुमताच्या आधारावर महाविकास आघाडीचे उमेदवार मनीष पाटील यांचे पारडे जड असल्याचे मानले जात आहे.

फोडाफोडीच्या राजकारणाला उधाण...

स्पष्ट बहुमत नसताना बँकेवर ताबा मिळविण्याचा महायुतीचा प्रयत्न आहे. त्यासाठी पालकमंत्री संजय राठोड, माजी मंत्री आमदार मदन येरावार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. परिणामी या निवडणुकीत साम, दाम, दंड, भेद अशा सर्वच बाजूंनी रणनीती आखली गेली आहे. त्यातूनच मतदानापूर्वी गुप्त भेटीद्वारे फोडाफोडीच्या राजकारणाला उधाण आले होते.

Edited By : Atul Mehere

Yavatmal District Central Cooperative Bank
Yavatmal OBC Andolan : ओबीसी आक्रमक : आरक्षण बचाव महासमितीने केले घंटानाद आंदोलन

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com