Yavatmal Drought : मदतीअभावी शेतकऱ्यांचा संताप, थेट तरूणाचा सरकारला इशारा; आता 'खिशात एखादा बॉम्ब टाकून मंत्र्याला मिट्टी मारू'

Yavatmal Farmers Drought Anger : राज्यात अनेक जिल्ह्यात पावसा अभावी स्थिती गंभीर झाली असून मराठवाड्यासह विदर्भातील जिल्ह्यांमध्ये देखील पावसाने ओढ दिल्याचे सध्या चित्र आहे.
Yavatmal Drought
Yavatmal Droughtsarkarnama
Published on
Updated on

Yavatmal Drought News : राज्यात दीर्घकाळ पावसाने ओढ दिल्याने दुष्काळाच्या झळा वाढल्या आहेत. मंत्री सध्या दुष्काळी पाहणी करण्यासाठी जिल्हावार दौरे करताना दिसत आहेत. मात्र अद्याप दुष्काळ जाहीर करण्यात आलेला नाही. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आणि कोणीही पात्र लाभार्थी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

मात्र शेतकऱ्यांचा संताप कायम असून यवतमाळ जिल्ह्यात मदतीअभावी शेतकऱ्यांचा संताप अनावर झाला आहे. तर यावेळी तीव्र संतापलेल्या एका तरूणाने, आता आम्ही आमचे जीवन संपवणार नसून खिशात एखादा बॉम्ब टाकून अखाद्या मंत्र्यालाच मिट्टी मारू असा थेट इशारा सरकारलाच दिला आहे. यामुळे सध्या एकच खळबळ उडाली असून सरकारविरोधात शेतकऱ्यांमधील विरोध वाढत असल्याचे दिसत आहे.

राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेल्या गंभीर दुष्काळी परिस्थितीचा आणि पावसाच्या खंडामुळे पीक नुकसानीचा राज्य सरकार तातडीने आढावा घेत असल्याची माहिती शनिवारी (ता.19) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. तसेच दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी आणि कोणीही पात्र लाभार्थी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी सरकार पूर्णपणे कटिबद्ध असल्याचेही सांगितले.

Yavatmal Drought
Akola drought review meeting : मराठवाड्यात काजू-बदाम अन् अकोल्यात प्रशासनाकडून जनतेची थट्टा! विभागीय आढावा बैठकीप्रसंगी अधिकारी मोबाईलमध्ये व्यस्त!

दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी सर्व पालकमंत्र्यांची बैठक घेण्यात आली होती. त्यांना आपापल्या जिल्ह्यांमधील पिकांचा उतारा, उत्पन्न आणि पाणीटंचाईचा आढावा घेण्याचे निर्देश दिले. येत्या आठवडाभरात संपूर्ण स्थितीची निश्चित माहिती घेऊन पाच ऑक्टोबरपर्यंत पंचनामे पूर्ण केले जातील. त्यानंतर एनडीआरएफकडे मदतीचा प्रस्ताव पाठवला जाईल.

मात्र, एनडीआरएफच्या मदतीची वाट न पाहता राज्य सरकार स्वतःच्या निधीतून शेतकऱ्यांना तातडीने मदत देईल. कर्जमाफीचे काम वेगाने कर्जमाफीचे काम वेगाने सुरू असून लाभार्थ्यांच्या याद्या अंतिम टप्प्यात आहेत. एकही पात्र शेतकरी यापासून वंचित राहू नये, याची दक्षता घेतली जात असल्याचे ते म्हणाले.

दरम्यान यवतमाळ जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्याचे सध्या चित्र आहे. तर सरकारने भरीव मदत करावी अशी मागणी शेतकरी करताना दिसत आहे. मात्र या मागणीवर सरकारकडून फक्त आश्वासन मिळत असल्याने जिल्ह्यातील शेतकरी चांगलाच आक्रमक झाला आहे.

Yavatmal Drought
Maharashtra drought relief 50000 per hectare : काजू-बदाम वादानंतर भरणेंचा ‘दुष्काळ’ दौरा वादात; 50 हजार मदतीवर म्हणाले, निर्णय फडणवीस घेतील

एका तरूण शेतकऱ्याने थेट सरकारलाच आता इशारा दिला आहे. या तरूणाने सरकारने भरीव मदत न केल्यास आता गळफास लावून आत्महत्या करण्याऐवजी आम्ही खिशात एखादा बॉम्ब टाकून मंत्र्याला मिट्टी मारून मरू, त्यांना घरात घुसून मारू. तर जोपर्यंत आम्हाला भरीव मदत मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नसल्याचे म्हणत संताप व्यक्त केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com