Maharashtra drought relief 50000 per hectare : काजू-बदाम वादानंतर भरणेंचा ‘दुष्काळ’ दौरा वादात; 50 हजार मदतीवर म्हणाले, निर्णय फडणवीस घेतील

Dattatray Bharne leaves the ₹50,000 drought relief decision to CM Devendra Fadnavis : बार-रेस्टॉरंट मालकाच्या शेतातील पाहणीवर प्रश्न; हेक्टरी 50 हजार मदतीच्या मागणीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंनी निर्णय मुख्यमंत्र्यांकडे सोपवला
Dattatray Bharne
Dattatray BharneSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra drought : काजू-बदामाच्या वादानंतर, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे दुष्काळाचा पाहणी दौरा एका बार अँड रेस्टॉरंट चालवणाऱ्या मालकाच्या शेतात झाला.

हा मुद्दा राज्यात गाजत असतानाच, दुष्काळात राज्य सरकारकडून हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळणार का? या प्रश्नावर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निर्णय घेतील असे सांगून, दुष्काळातील मदतीचा चेंडू थेट मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात टोलवला.

कृषी मंत्री दत्तात्रय भरणे (Dattatray Bharne) यांच्या अध्यक्षतेखाली काल नांदेडमध्ये दुष्काळ आढावा बैठक झाली. या बैठकीत सहभागी झालेले लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार काजू-बदाम खात असल्याचा व्हिडिओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला. एकनाथ शिंदे शिवसेनेत दाखल झालेले खासदार संजय जाधव यांचा व्हिडिओ सर्वाधित चर्चेत राहिला.

दत्तात्रय भरणे यांनी, काजू-बदाम आमच्यासमोर आले नाहीत, असे स्पष्टीकरण दिले. परंतु दुष्काळाचा पाहणी दौरा एका बार अँड रेस्टॉरंट चालवणाऱ्या मालकाच्या शेतात झाल्याचा वादात मंत्री भरणे अडकले. यावर स्पष्टीकरण देताना, मंत्री भरणे यांनी पाहणी दौऱ्यात माझ्याकडे शेतकरी (Farmer) हाच निकष आहे, असे सांगितले.

Dattatray Bharne
Sanjay Jadhav Cashew Almond Video : दुष्काळी बैठकीत काजू-बदामावरून वाद; भरणेंचं स्पष्टीकरण, जाधव म्हणाले...

दुष्काळाची पाहणीसाठी दिवसभर फिरत आहे. फक्त शेतकरी एवढाच निकष, माझ्या पाहणी दौऱ्यात आहे. तो श्रीमंत आहे की, गरीब किंवा त्याचा इतर कोणता व्यावसाय, हे मी काय पाहात बसलेलो नाही. आज दिवसभर दुष्काळाचा फटका बसलेल्या गरीब शेतकऱ्यांच्या पिकांची पाहणी करणार असल्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केला.

Dattatray Bharne
Nila Vikhe Patil Sweden Parliament : अहिल्यानगरची लेक थेट स्वीडनच्या संसदेत; विखे पाटलांच्या पुतणीचा दणदणीत विजय

दुष्काळातील शेतकऱ्यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत मिळणार का? हा प्रश्न केल्यावर मंत्री भरणे काहीसे थांबून, त्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील, असे सांगितले. मंत्री भरणे यांनी शेतकऱ्यांच्या दुष्काळी मदतीचा चेंडू कृषीमंत्र्यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे टोलवल्याने, त्यांच्याकडील खात्यासंदर्भातील निर्णय प्रक्रियेच्या अधिकारांची चर्चा आता होऊ लागली आहे.

खासदार जाधवांच्या मागणीला बगल

एकनाथ शिंदे शिवसेनेत दाखल झालेले खासदार संजय जाधव यांनी बैठकीला काजू-बदाम ठेवणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी केली आहे. त्यावर मंत्री दत्तात्रय भरणे यांनी, कोणता विषय कुठे न्यायचा, हे योग्य नाही. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. त्याला जास्तीत जास्त मदत करायची आहे. त्यावर काम करायचे आहे, असे सांगून खासदार जाधव यांच्या मागणीला बगल दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com