Yavatmal Politics : यवतमाळ जिल्ह्यातील मनसेच्या अडचणी वाढल्या, खंडणीखोर नेत्याचा अटकपूर्व जामीन फेटाळला

MNS Leader Raju Umbarkar Bail Rejected : यवतमाळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भातील एकमेव नेते राजू उंबरकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. त्याच्या विरुद्ध खंडणी आणि कामगारांना मारहाण करण्याचा गुन्हे दाखल आहेत. अटक टाळण्यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून फरार आहे.
MNS
MNSSarkarnama
Published on
Updated on

Yavatmal News, 15 Oct : यवतमाळ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे विदर्भातील एकमेव नेते राजू उंबरकर यांचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. त्याच्या विरुद्ध खंडणी आणि कामगारांना मारहाण करण्याचा गुन्हे दाखल आहेत.

अटक टाळण्यासाठी ते गेल्या काही दिवसांपासून फरार आहे. आता त्याचा अटकपूर्व जामीनसुद्धा फेटाळल्याने उंबरकरच्या अडचणीत वाढ झाली आहे. उंबरकरच्या कारनाम्यामुळे यवतमाळ जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसेला महाविकास आघाडीत घेण्यास विरोध होत आहे.

यवतमाळ जिल्ह्यातील वणी येथील एका रस्ते बांधकाम कंत्राटदाराला उंबरकर याने फोन करून दीड कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. ती देण्यास नकार दिल्याने त्याने कंत्राटदाराच्या कामगारांना बेदम मारहाण केली, तसेच त्याचा प्लांट बंद पाडला. खंडणी दिली नाही तर वणीत पाय ठेऊ दिला जाणार नाही अशा धमक्याही दिल्या होत्या.

कंत्राटदाराच्या तक्रारीवरून वणी पोलिसांनी उंबरकरच्या विरोधात गुन्हे दाखल केले आहे. हे समजताच तो फरार झाला. गेल्या काही दिवसांपासून अटक टाळण्यासाठी तो लपून बसला आहे. दरम्यान त्याने अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. उंबरकर याने दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवली आहे.

MNS
Bihar Election : बिहारच्या राजकारणात मोठा उलटफेर; प्रशांत किशोर यांनी निवडणुकीपूर्वीच मैदान सोडलं

दोन्ही वेळा तो पराभूत झाला. त्याच्या प्रचारासाठी दोन्ही वेळा राज ठाकरे यांनी जाहीर सभा घेतल्या. विधानसभा निवडणुकीपूर्वी राज ठाकरे यांनी विदर्भातील पक्ष संघटनेत मोठे बदल केले. अनेक जुन्या लोकांना घरी बसवले. नव्या दमाच्या कार्यकर्त्यांना पदाधिकारी केले. राजू उंबरकरला मनसेचे नेते म्हणून पदोन्नती देण्यात आली.

राज ठाकरे यांनी उंबरकरच्या घरी भोजनाचा आस्वाद घेतला होता. तेव्हापासून त्याचा यवतमाळ जिल्ह्यात दबदबा निर्माण झाला होता. उंबरकर याचा भाऊ कंत्राटदार आहे. त्याला कंत्राट मिळवून देण्यासाठी राजू उंबरकर आपल्या पदाचा वापर करीत होता. अटक टाळण्यासाठी उंबरकरने आपले राजकीय लागेबांधे वापरून बरीच खटपट केली असल्याचे समजते.

MNS
Uddhav Thackeray: दिवे 'मनसे' लावणार, उद्घाटन 'शिवसेना' करणार : ठाकरे बंधूंच्या 'मिले सूर मेरा तुम्हारा'चा आणखी एक अध्याय

काही दिवस तो नागपूरमध्ये लपून बसला होता. नागपूरच्याच एका पदाधिकाऱ्याने त्याला आपल्या हॉटेलमध्ये ठेवले होते असे सांगण्यात येते. सध्या ग्रामीण भागात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे वारे वाहत आहे.

मनसे आणि शिवसेना जवळ येत आहे. स्थानिक निवडणुकीत मनसेला महाविकास आघाडीत घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेसने यास अद्याप होकार आणि नकारही कळविलेला नाही. मात्र उंबरकरच्या कारनाम्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात मनसेला सोबत घेण्यास विरोध होण्याची शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com