
Nagpur News, 29 Jan : युवक काँग्रेसच्या (Youth Congress) महाराष्ट्रातील पदाधिकाऱ्यांना पाठोपाठ धक्के दिले जात आहेत. आधी युवक काँग्रेसच्या 60 पदाधिकाऱ्यांना पदमुक्त करण्यात आले. त्यानंतर कुणाल राऊत यांचे पंख छाटून कार्यकाही अध्यक्ष नियुक्त करण्यात आला होता. आता चार पदाधिकाऱ्यांना कायमस्वरूपी निष्कासित करण्यात आलं आहे. त्यामुळे युवक काँग्रेसमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे.
निष्कासित करण्यात आलेल्यांमध्ये प्रदेश उपाध्यक्ष तनवीर अहमद, महासचिव अनुराग भोयर, सचिव अक्षय हेटे आणि नागपूर (Nagpur) ग्रामीणचे अध्यक्ष मिथिलेश कन्हेरे यांचा समावेश आहे. या चौघांवर पक्षशिस्त मोडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे या पक्ष आदेशात नेते पुत्र केतन ठाकरे आणि शिवानी वडेट्टीवार (Shivani Wadettiwar) यांचा समावेश नाही. युवक काँग्रेसचे प्रदेश प्रभारी अजय चिकारा यांनी या आदेश काढला असून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही याची प्रत पाठवण्यात आली आहे.
युवक काँग्रेसच्यावतीने सरसंघचालक मोहन भागवत (Mohan Bhagwat) यांच्या विरोधात महाल येथील संघ मुख्यालयासमोर आंदोलन केले होते. या आंदोलनाला दांडी मारणाऱ्या 60 पदाधिकाऱ्यांना तडकाफडी पदमुक्त करण्याचे आदेश युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांनी काढले होते. हा निर्णय प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत यांच्या सांगण्यवरून घेण्यात आल्याचा पदमुक्त पदाधिकाऱ्यांचा आरोप होता. आंदोलनाची तारीख आणि वेळ दोन वेळा बदलण्यात आली. त्याची माहिती पदाधिकाऱ्यांना देण्यात आली नाही.
वेळेवर सूचना देण्यात आली नव्हती. त्यामुळे अनेकांनी मेसेज बघितला नाही आणि काही नागपूरमध्ये नव्हते असे त्यांचे म्हणणे आहे. पदमुक्त करण्यात आलेल्यांमध्ये शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे यांचे चिरंजीव केतन ठाकरे, माजी विरोधीपक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्यासह अनेकांचा समावेश होता. याची कुणाल राऊत यांची तक्रार दिल्लीत करण्यात आली होती.
त्यानंतर तडकाफडी कार्यकारी अध्यक्षपदी शिवराज मोरे यांच्या नियुक्ती करून राऊत यांचे पंख छाटण्यात आले होते. काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. कुठलाही महत्त्वाचा निर्णय घेण्यासाठी काही नियमावरीली पक्षाने तयार केली आहे. कारवाई व पदमुक्त करायचे असले तर संबंधिताला नोटीस बजावून त्याचे म्हणणे ऐकूण घ्यावे लागते. मात्र कुणाल राऊत यांनी सर्व नियमावली डावलून हुकूमशाही पद्धतीने युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष, सरचिटणीस, चिटणीस यासह विविध पदाधिकाऱ्यांना पदमुक्त केले.
कुणाल राऊत पक्षशिस्त न पाळता, स्वमालकीची प्रॉपर्टी असल्याप्रमाणे संघटना चालवत असल्याच्या अनेक तक्रारी दिल्लीत करण्यात आल्या होत्या. त्यांनी अध्यक्ष म्हणून कुठलीही जबाबदारी पार पाडली नाही, सक्रिय पदाधिकाऱ्यांना सूडबुद्धीने पदमुक्त केल्याच्या त्यांच्या विरोधात तक्रारी करण्यात होत्या. आता चार पदाधिकाऱ्यांना कायमस्वरुपी निष्काशित करण्यात आल्याने अनेकांना धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.