Vijay Shivtare News : शिवतारेंनी टाकला नवा डाव, 'या' पक्षाकडून लढण्याची व्यक्त केली इच्छा

Baramati Lok Sabha Election 2024 : बारामती लोकसभा मतदारसंघातून लढण्याचा निर्धार विजय शिवतारेंनी कायम ठेवला आहे.
Vijay Shivtare
Vijay ShivtareSarkarnama
Published on
Updated on

Pune News : बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे ( Supriya Sule ) आणि सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांच्यात लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे. या लढतीकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. पण, शिवसेना नेते, माजी आमदार विजय शिवतारे ( Vijay Shivtare ) यांच्या एन्ट्रीनं निवडणुकीत ट्विस्ट आला आहे. शिवतारे उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांना लक्ष्य करत असून, बारामतीतून निवडणूक लढणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे. अशातच आता शिवतारेंनी केलेल्या नव्या विधानामुळे चर्चेला उधाण आलं आहे.

"बारामती मतदासंघातून ( Baramati Lok Sabha Election 2024 ) भाजपच्या कमळ चिन्हावर लढण्याची माझी तयारी आहे. मी निवडणूक लढली नाही, तर जनता माझ्यावर शिस्तभंगाची नव्हे, तर आयुष्याची कारवाई करतील," असं वक्तव्य शिवतारेंनी ( Vijay Shivtare ) केलं आहे. ते एका प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"...तर बारामतीतून निश्चित निवडून येणार"

"मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) यांनी लेखी पत्र लिहित बारामतीची जागा महायुतीमधून शिवसेनेकडे घेण्याची विनंती केली आहे. निवडून येणे हाच निकष असेल, तर ही जागा निश्चित मी जिंकेल. पण, ही जागा आपल्या वाट्याला येत नाही, हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. मात्र, अनेक ठिकाणी भाजपची जागा शिवसेनेकडे किंवा शिवसेनेचा उमेदवार भाजपकडे गेला आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही जागा शिवसेनेकडे घ्यावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे केली आहे," असं शिवतारेंनी सांगितलं.

Vijay Shivtare
Ajit Pawar Vs Vijay Shivtare: पुरंदरचे 'बापू' बारामतीत अपक्ष म्हणून उभे राहिले, तर शिवसेनेचे राज्यभरातील उमेदवार अडचणीत येणार

"अपक्ष लढलो तरी जिंकणार आहे"

"जसं शिवाजीराव आढळराव-पाटील ( Shivajirao Adhalrao Patil ) शिवसेनेतून राष्ट्रवादीत जात 'घड्याळ' चिन्हावर लढणार आहेत. तसंच भाजपच्या कमळावर लढण्याची माझी तयारी आहे. मी अपक्ष लढलो तरी जिंकणार आहे," असा विश्वास शिवतारेंनी व्यक्त केला.

"मी निर्णय मागे घेणार नाही"

"महायुतीतून काही निर्णय होत नसेल, तर जनतेचा आवाज मला महत्त्वाचा आहे. मी लढलो नाही, तर जनता माझ्यावर शिस्तभंगाची नव्हे, तर आयुष्याची कारवाई करतील. मी निर्णय मागे घेणार नाही. मला पक्षानं सांगितलं तर स्वत:हून राजीनामा द्यायला तयार आहे," असंही शिवतारेंनी स्पष्ट केलं.

R

Vijay Shivtare
Vijay Shivtare On Ajit Pawar : अजित पवारांविरोधात आक्रमक झालेल्या शिवतारेंना ‘इंदापूर पॅटर्न’चा धसका...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com